शिरूर येथे निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा निषेध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिरूर येथे निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा निषेध
शिरूर येथे निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा निषेध

शिरूर येथे निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा निषेध

sakal_logo
By

शिरूर, ता. २२ : शिवसेना पक्षनाव व धनुष्यबाण चिन्ह, एकनाथ शिंदे यांना सोपविण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याविरोधात आज शिरूर येथे निदर्शने करताना निवडणूक आयोग बरखास्तीची मागणी करण्यात आली.
येथील बाजार समितीच्या आवारातील शिवरायांच्या पुतळ्यासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ‘उद्धव ठाकरे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘आदित्य ठाकरे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है’ च्या घोषणा देत निदर्शने केली. यावेळी निवडणूक आयोग व अमित शहा यांचा निषेध नोंदविला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख पोपट शेलार व शहर प्रमुख सुनील जाधव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात कैलास भोसले, खुशाल गाडे, अविनाश घोगरे, अनिल पवार, सुमन वाळूंज, राहुल मोहळकर, विशाल फलके, गणेश शिवले, भीमराव कुदळे, संतोष काळे, आबासाहेब काळे, अनिल सातकर, अंकुश काळे, विजय लोखंडे, महेंद्र येवले, सोनू काळोखे, आकाश चौरे, राहुल शिंदे यांच्यासह तालुक्यातील शिवसैनिक सहभागी झाले होते.
‘‘कुठलीही बाजू ऐकून न घेता आणि ठोस पुराव्यांकडे डोळेझाक करीत निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव व धनुष्यबाण चिन्ह गद्दारांना दिले. यातूनच निवडणूक आयोग केंद्र सरकारचे गुलाम असल्यासारखे वागत असल्याचे स्पष्ट होते,’’ असा आरोप शेलार यांनी केला. आमचा पक्ष फक्त उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे असल्याचे ठाम प्रतिपादन सुनील जाधव यांनी केले.