निर्वी येथे सौर कृषी पंपाच्या स्टार्टरची चोरी

निर्वी येथे सौर कृषी पंपाच्या स्टार्टरची चोरी

शिरूर, ता. २२ : निर्वी (ता. शिरूर) येथे एका शेतात बसविलेल्या सोलर कृषीपंपाचा वीस हजार रुपये किमतीचा स्टार्टर मंगळवारी (ता. २१) रात्री चोरट्यांनी चोरून नेला.
याबाबत सुमन हरिभाऊ कांबळे (रा. निर्वी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. नदीकिनारचे कृषीपंप, मोटारी, कृषीपंपाच्या केबल किंवा ट्रान्सफॉर्मर फोडून त्यातील तांब्याच्या तारा व ऑइल चोरीला जाण्याचे प्रकार शिरूर तालुक्यात नित्याचे झाले असतानाच महिला शेतकऱ्याच्या सोलर कृषीपंपाचा स्टार्टर चोरीला गेल्याने शेतकऱ्यांमध्ये कृषी साहित्याचे रक्षण कसे करावे, याबाबत चिंतेचे वातावरण पसरले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांबळे यांच्या शेतातील विहिरीजवळ सोलर कृषिपंप बसविला आहे. या पंपाला ॲटोमॅटिक स्टार्टर बसविलेला आहे. बुधवारी सकाळी कृषिपंप चालू का होत नाही, हे पाहायला कांबळे गेल्या असता स्टार्टर चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी पोलिसांकडे धाव घेत फिर्याद दिली. पोलिस नाईक विशाल कोथळकर यांनी घटनास्थळी भेट दिली असून, पंचनामा केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com