शिरूरमध्ये एकाची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिरूरमध्ये एकाची आत्महत्या
शिरूरमध्ये एकाची आत्महत्या

शिरूरमध्ये एकाची आत्महत्या

sakal_logo
By

शिरूर, ता. २४ : शिरूर येथील लाटेआळी परिसरातील अशोक भागाजी अवचिते (वय ४०) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी (ता. २१) सकाळी ही घटना उघडकीस आली.
याबाबत अशोक अवचिते यांचे चुलत भाऊ दीपक हरिभाऊ अवचिते यांनी माहिती दिल्यानंतर शिरूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक अवचिते हे सोमवारी रात्री लाटेआळी परिसरातील आपल्या घरातील खोलीत एकटेच झोपले होते. मंगळवारी सकाळी आवाज देऊनही ते न उठल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी दरवाजा तोडला असता त्यांनी घरातच गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. प्रथमदर्शनी केलेल्या पंचनाम्यानुसार, अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, कुटुंबीय व नातेवाईकांचे जाबजबाब नोंदवून गुन्हा दाखल केला जाईल, असे या प्रकरणाचा तपास करणारे पोलिस नाईक प्रताप टेंगले यांनी सांगितले.