
दहावीतील विद्यार्थ्याची ढोकसांगवीत आत्महत्या
शिरूर, ता. २४ : ढोकसांगवी (ता. शिरूर) येथील दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. यामुळे परिसरात हळहळ पसरली. ही घटना सोमवारी (ता. २०) रात्री साडेआठच्या सुमारास घडली. अथर्व भानुदास निचित (वय १६) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.
अथर्वचे वडील भानुदास जगन्नाथ निचित यांनी याबाबतची खबर रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अथर्व निचित मूळचा वडनेर (ता. शिरूर) येथील रहिवासी असून, गेल्या काही दिवसांपासून ढोकसांगवी येथे आजीकडे आला होता. सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास घरातील स्लॅबच्या हुकाला दोरीने गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली.
अथर्वच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समजू शकले नसल्याने रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास पोलिस हवालदार विजय सरजिने करीत आहेत.