वीजचोरीचा चौघांवर गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वीजचोरीचा चौघांवर गुन्हा दाखल
वीजचोरीचा चौघांवर गुन्हा दाखल

वीजचोरीचा चौघांवर गुन्हा दाखल

sakal_logo
By

शिरूर, ता. २४ : ''महावितरण'' ने वीजबिल वसुली आणि वीजचोरीविरूद्ध कडक मोहीम उघडली असून, महावितरणच्या तक्रारीवरून रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी काल चौघांविरुद्ध वीजचोरीचा गुन्हा दाखल केला. या चौघांनी मिळून ७२ हजार ३५० रुपयांची वीजचोरी केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
महावितरणचे रांजणगाव विभागाचे उपअभियंता दीपक पाचुंदकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी जयसिंग महादू साकोरे (रा. करंजावणे, ता. शिरूर), रंगनाथ महादू सरोदे, गोदाजी किसन फलके व दिलीप सोपान शिरवळे (तिघे रा. कारेगाव, ता. शिरूर) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तिघांनी १५ ऑक्टोबर २०२२ ते १३ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत करंजावणे व कारेगाव या गावांच्या हद्दीत वेळोवेळी वीजचोरी केली. महावितरणच्या कारवाईत ही वीजचोरी पकडण्यात आली व चोरलेल्या वीजेचे मूल्य ७२ हजार ३५० रुपये इतके ठरविण्यात आले.
ही रक्कम भरण्याबाबत संबंधितांना नोटिसा बजावूनही त्यांनी वीजचोरीची रक्कम न भरल्याने पाचुंदकर यांनी त्यांच्याविरोधात कलम १३५ अनुसार रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.