औंदुबर काशीद यांना पुन्हा कामावर घेण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

औंदुबर काशीद यांना पुन्हा 
कामावर घेण्याची मागणी
औंदुबर काशीद यांना पुन्हा कामावर घेण्याची मागणी

औंदुबर काशीद यांना पुन्हा कामावर घेण्याची मागणी

sakal_logo
By

शिरूर, ता. ३ : ‘बेकार्ट इंडस्ट्रीज प्रा. लि.’ या कंपनीने बडतर्फ केलेल्या औदुंबर काशीद यांना मानवतेच्या दृष्टिकोनातून पुन्हा कामावर घ्यावे, अशी आग्रही मागणी मानव विकास परिषदेचे प्रदेशाध्यक्ष संदीप कुटे यांनी
कंपनी व्यवस्थापनाकडे केली.
रांजणगाव (ता. शिरूर) ‘एमआयडीसी’तील बेकार्ट कंपनीत सन २००७ ते २०१५ या कालावधीत प्रॉडक्शन ऑपरेटर म्हणून कार्यरत असलेल्या औदुंबर काशीद यांनी कामकाजादरम्यान गॉगल न वापरणे व मोबाईल वापरल्याचा ठपका ठेवून कंपनीने त्यांना बडतर्फ केले. माझी कुठलीही बाजू कंपनी व्यवस्थापनाने ऐकून घेता ही एकतर्फी कारवाई केल्याचा काशीद यांचा आरोप असून, तेव्हापासून या अन्यायाविरूद्ध न्यायालयीन लढा देणाऱ्या काशीद यांनी गेल्या २७ फेब्रुवारीपासून कंपनीसमोर उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या पाचव्या दिवशी संदीप कुटे यांनी त्यांची भेट घेतली. त्यांच्या मागण्या जाणून घेतल्यानंतर कंपनी व्यवस्थापनाशीही चर्चा केली. काशीद यांच्या उपोषणामागील भूमिकेचा मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार करावा, त्यांच्या कौटुंबिक स्थितीची जाणीव ठेवून त्यांच्यावरील कारवाईचा सहानुभूतीने विचार करावा व त्यांना पुन्हा कामावर घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली. मात्र, ही न्यायप्रविष्ट बाब असल्याने त्याबाबत अधिक बोलण्याचे टाळताना, हा विषय कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापनापुढे ठेवू, असे कंपनीतील इंडस्ट्रिअल रिलेशन्स विभागाचे सहायक व्यवस्थापक सुनील चव्हाण यांनी सांगितले.