शिरूर येथे रंगला कलावंतांचा सन्मान सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिरूर येथे रंगला कलावंतांचा सन्मान सोहळा
शिरूर येथे रंगला कलावंतांचा सन्मान सोहळा

शिरूर येथे रंगला कलावंतांचा सन्मान सोहळा

sakal_logo
By

शिरूर, ता. ४ ः मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून शिरूर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आयोजिलेल्या मराठी लोक कलावंतांच्या सन्मान सोहळ्यात विलास महाराज पवार, भजन सम्राट श्रीहरी मेंदरकर, संगीतकार सौरभ मास्तोळी, लोकशाहीर बाळासाहेब कान्हेरे, संमोहन तज्ज्ञ मुकुंद देंडगे, ताशा सम्राट याकुबभाई मणियार, संबळ वादक दगडू घोगरे, ढोलकी वादक सुरेश चव्हाण, जागरण गोंधळ कलाकार काळुराम धोंगडे, लोककलावंत फक्रुद्दीन इनामदार, तबला वादक सदाशिव संभुदास, मृदंग वादक रवींद्र घेगडे यांचा ‘मराठी राज गौरव पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला.
घोडगंगा कारखान्याचे माजी संचालक धरमचंद फुलफगर, चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. बाळकृष्ण लळीत, हिंदी विभाग प्रमुख प्रा. ईश्वर पवार, विद्याधाम प्रशालेचे माजी मुख्याध्यापक व्ही. डी. कुलकर्णी व अनिल तांबोळी, आम्ही शिरूरकर फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र बापू सानप, शिरूर तालुका मुद्रक संघाचे अध्यक्ष बाबूराव पाचंगे, जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर, उद्योजक अमित कर्डिले आदी यावेळी उपस्थित होते.
ज्ञानदानातील योगदानाबद्दल सेंट जोसेफ इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्य नॅन्सी पायस, बालाजी विद्यालयाचे विनायक म्हसवडे, डेक्कन एज्युकेशनच्या इंग्लिश मीडियम स्कूलचे समीर ओंकार, ज्ञानगंगा विश्वविद्यालयाचे डॉ. नितीन घावटे, गुरूवर्य शंकरराव भुजबळ विद्यालयाच्या अंजुम पठाण, साधना इंटरनॅशनल स्कूलच्या साधना शितोळे यांचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी निर्वी येथील बालेशा सनई ताफ्यातील कलावंतांनी ताशा व सनईच्या सुरात सादर केलेल्या कडक आविष्काराला उपस्थितांनी टाळ्या - शिट्ट्यांची दाद दिली. मल्हार वारी मोतियानं द्यावी भरून आणि गोमू संगतीनं माझ्या तू येशील का या प्रीती पेटकर व माधुरी अत्रे यांनी सादर केलेल्या गाण्यांवर उपस्थितांनी ठेका धरला. हर्षद गणबोटेंच्या ढोलकीवर फिदा झालेल्या उपस्थितांनी ढोलकीच्या बारीक नादावर टाळ्यांचा गजर केला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष महिबूब सय्यद यांनी उपस्थितांचे स्वागत केले. विद्याभारती शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक प्रा. अशोक शेळके यांनी प्रास्ताविक केले. रावसाहेब चक्रे यांनी सूत्रसंचालन केले. प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे यांनी आभार मानले. मनसे जनहित कक्षाचे शहराध्यक्ष रविराज लेंडे, मनसे विधी विभागाचे तालुकाध्यक्ष ॲड. आदित्य मैड, रमणलाल भंडारी, सुनील खेडकर, डॉ. वैशाली साखरे यांनी या सोहळ्याचे संयोजन केले.

परांडे, हेलावडे यांची
निबंध स्पर्धेत बाजी
मराठी राजभाषा दिनानिमित्त मनसेने आयोजिलेल्या निबंध स्पर्धेत, लहान गटात नेहा परांडे, विश्वदीप भोसले, आसावरी गुणे, वैष्णवी पाटील, कार्तिकी पाटील, लिकीषा सारडा, अनुष्का शेवाळे यांनी तर मोठ्या गटात काजल हेलावडे, श्रेया वाघमारे, संकेत चौरे, दीपाली जाधव, नम्रता आदलिंग, श्रेया भोसले, प्रणव रसाळ यांनी नैपुण्यपद मिळविले. वक्तृत्व स्पर्धेत लहान गटात पल्लवी लभडे, अमृता डांगे, सानिका घेगडे यांनी तर मोठ्या गटात ऊर्मी जांगडे व वैष्णवी लांडे यांनी छाप उमटवली.