शिरूरमध्ये इम्तियाज जलिल यांचा निषेध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिरूरमध्ये इम्तियाज जलिल यांचा निषेध
शिरूरमध्ये इम्तियाज जलिल यांचा निषेध

शिरूरमध्ये इम्तियाज जलिल यांचा निषेध

sakal_logo
By

शिरूर, ता. १२ : दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल अवमानकारक उद्गार काढल्याप्रकरणी शिवसेना व भाजपच्या कार्यकर्त्यांनी खासदार इम्तियाज जलिल यांचा येथे निषेध केला. येथील नगर परिषदेच्या जुन्या कार्यालयाजवळ निषेधाच्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी काही वेळ निदर्शने केली.
शिवसेनेचे शहर प्रमुख मयूर थोरात, शहर संघटक सुरेश गाडेकर, उपशहरप्रमुख भरत जोशी, भाजप अल्पसंख्याक आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा रेश्मा शेख, युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष उमेश शेळके, भाजप आध्यात्मिक आघाडीचे तालुकाध्यक्ष प्रमोद जोशी महाराज, भाजपचे शहर सरचिटणीस विजय नरके, श्यामकांत वर्पे, नीलेश नवले, अनघा पाठकजी, राजू पुणेकर, केशव लोखंडे आदी या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक संदीप यादव यांना यावेळी निवेदन देण्यात आले. जलिल यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाईची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. जलिल यांच्यावर कायदेशीर कारवाई न झाल्यास याहून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा उमेश शेळके यांनी दिला.