
वढू बुद्रुक येथील सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन
शिरूर, ता. १८ : वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे येत्या मंगळवारी (ता. २१) छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिन सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून, या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी येथे केले.
वढू बुद्रुक येथे होणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन सोहळ्याची माहिती देण्यासाठी एकबोटे यांनी येथे विविध संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. वढू येथे मंगळवारी सकाळी ११ वाजता अखिल भारतीय आतंकवाद विरोधी मंचाचे प्रमुख मनिंदरसिंग बिट्टा व ‘सुदर्शन चॅनेल’चे संपादक सुरेश चव्हाणके यांच्या उपस्थितीत मुख्य सोहळा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
शिवराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष बापूसाहेब काळे, भाजप आध्यात्मिक आघाडीचे शिरूर शहराध्यक्ष प्रमोद जोशी ऊर्फ बापू महाराज, कार्याध्यक्ष राजेंद्र शहाणे, बजरंग दल शिरूर प्रखंडचे प्रमुख अजिंक्य तारू, चंद्रकांत आराध्ये, सागर सारंगधर, विनायक म्हसवडे, पद्मराज कोळपकर आदी यावेळी उपस्थित होते.