शिरूरमध्ये तरुणाकडून पिस्तूल जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिरूरमध्ये तरुणाकडून पिस्तूल जप्त
शिरूरमध्ये तरुणाकडून पिस्तूल जप्त

शिरूरमध्ये तरुणाकडून पिस्तूल जप्त

sakal_logo
By

शिरूर, ता. १९ : कंबरेला पिस्तूल लावून शिरूरच्या भर बाजारपेठेत फिरणाऱ्या तरुणाला शिरूर पोलिसांनी शिरूर बसस्थानकाजवळ सापळा लावून पकडले. त्याच्याकडून तीस हजार रुपये किमतीचे दोन जिवंत काडतूसांनी भरलेले गावठी बनावटीचे पिस्तूल जप्त केले. पृथ्वीराज गणपत बेंद्रे (वय ३२, रा. आंबळे, ता. शिरूर) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव असून, त्याच्याविरुद्ध अग्निशस्त्र प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. शनिवारी (ता. १८) रात्री नऊच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली.
एक तरुण कंबरेला पिस्तूल लावून फिरत असल्याचा निनावी फोन शिरूर पोलिस ठाण्यात आल्यानंतर पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी गुन्हे शोध पथकाला अलर्ट करीत कारवाईच्या सूचना दिल्या. पोलिस उपनिरीक्षक एकनाथ पाटील, पोलिस नाईक नाथसाहेब जगताप, पोलिस अंमलदार सचिन भोई, विनोद काळे, प्रवीण पिठले या पथकाने मिळालेल्या माहितीनुसार शिरूर बाजारपेठेतून शोध घेतला. मात्र, संबंधित तरुणाचा ठावठिकाणा लागू शकला नाही. त्याचवेळी तो तरुण शिरूर बसस्थानक परिसरात आला असल्याचे समजताच पथकाने तेथे सापळा लावला व त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता दोन काडतूसांनी भरलेले गावठी बनावटीचे पिस्तूल त्याच्या कंबरेला आढळून आले. पोलिसांनी हे पिस्तूल चालविण्याच्या शस्त्र परवान्याबाबत बेंद्रे याच्याकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले व बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली. पोलिस नाईक जगताप पुढील तपास करीत आहेत.