शिरूर तालुक्यातील महाविद्यालयांचे यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिरूर तालुक्यातील महाविद्यालयांचे यश
शिरूर तालुक्यातील महाविद्यालयांचे यश

शिरूर तालुक्यातील महाविद्यालयांचे यश

sakal_logo
By

शिरूर, ता. २८ : बारावीच्या परीक्षेत, शिरूर तालुक्यातील अनेक महाविद्यालयांनी उल्लेखनीय यश मिळविले असून, शिरूर तालुक्याचा सरासरी निकाल ९५.९५ टक्के लागल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी अनिल बाबर यांनी दिली. तालुक्यातील १३ कनिष्ठ महाविद्यालयांनी बारावीच्या परीक्षेत शंभर टक्के यश मिळविले आहे.
मार्च २०२३ ला झालेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. शिरूर तालुक्यातील महाविद्यालयांनी शेकडा निकालात सातत्य राखल्याचे दिसून आले. शिरूर तालुक्यात एकूण ३९ कनिष्ठ महाविद्यालये असून ग्रामीण भागात महाविद्यालयांच्या निकालाचा आलेख शहराच्या तुलनेत सरस असल्याचे त्यांनी सांगितले. तालुक्यात एकूण पाच हजार ३६७ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी पाच हजार १५० विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले.
बारावीच्या परीक्षेत शंभर टक्के निकाल लागलेल्या महाविद्यालयांची नावे गावनिहाय : विद्याधाम प्रशाला-शास्त्र शाखा (शिरूर), सरदार रघुनाथ ढवळे ज्युनिअर कॉलेज (केंदूर), भैरवनाथ कनिष्ठ महाविद्यालय (करडे), कै. रामराव गेणूजी पलांडे कनिष्ठ महाविद्यालय (मुखई), सूर्यकांत पलांडे कनिष्ठ महाविद्यालय (शिरूर), स्वातंत्र्यसैनिक शंकरराव बाजीराव डावखरे विद्यालय (पिंपळे-हिवरे), कालिकामाता विद्यालय-वाणिज्य शाखा (वाघाळे), गुरुदेव दत्त विद्यालय-शास्त्र शाखा (सविंदणे), अजिंक्यतारा ज्युनिअर कॉलेज (शिक्रापूर), विद्यानिकेतन ज्युनिअर कॉलेज (कोंढापुरी), आर. एम. धारिवाल इंग्लिश मीडियम स्कूल (शिरूर), कारेश्वर इंग्लिश मीडियम कनिष्ठ महाविद्यालय (कारेगाव).