अल्पवयीन मुलाकडून वडिलांवर हल्ला

अल्पवयीन मुलाकडून वडिलांवर हल्ला

शिरूर, ता. ८ : जमिनीच्या व कौटुंबिक वादातून जन्मदात्या वडिलांवर अल्पवयीन मुलाने कोयत्याने हल्ला करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मलठण (ता. शिरूर) येथील नानीचा मळा परिसरात बुधवारी (ता. ७) भरदिवसा हा प्रकार घडला.
मुलाने केलेल्या हल्ल्यात लक्ष्मण ज्ञानेश्वर तांबे (वय ४७, रा. रावडेवाडी, ता. शिरूर) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना पुण्यातील खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांच्या १६ वर्षांच्या मुलावर शिरूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हल्ल्यानंतर तो पळून गेला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तांबे हे मूळचे रावडेवाडी येथील रहिवासी असून, कामानिमित्त ते सध्या वाकी खुर्द (ता. खेड) येथे दुसऱ्या पत्नीसह वास्तव्यास आहेत. हल्लेखोर हा त्यांच्या पहिल्या पत्नीचा मुलगा असून, जमिनीच्या व इतर कौटुंबिक कारणावरून त्यांच्यात वाद होते फिर्यादी तांबे हे बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास आई, वडील व बहिणीला भेटण्यासाठी सविंदणे (ता. शिरूर) येथे आपल्या दुचाकीवरून जात असताना हल्लेखोर मुलाने त्याच्याजवळील दुचाकीवरून पाठलाग करून मलठण गावाजवळील नानीचा मळा परिसरात दुचाकी आडवी लावून त्यांना थांबविले व ‘तुला लई माज आलाय का, तुझी व आईची कोर्टातील केस मिटवून घे,’ असे म्हणत धमकी दिली. त्यावेळी बाचाबाची झाल्याने त्याने स्वतःजवळील बॅगेतून कोयता काढून वडिलांवर हल्ला केला. यात लक्ष्मण तांबे यांच्या डोक्यावर, डाव्या कानाच्या वर, गालावर गंभीर जखमा झाल्या. ते खाली पडले असता पुन्हा कोयत्याने वार केला. तेव्हा त्यांनी हाताने हा वार अडविल्याने उजव्या हाताच्या तळव्यावर व बोटांना गंभीर दुखापत झाली. रस्त्याने जाणाऱ्या बघ्यांची गर्दी वाढल्याने हल्लेखोर स्वतःच्या दुचाकीवरून पळून गेला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com