

शिरूर, ता. १० : वाद्यांच्या गजर आणि ‘प्रेम से बोलो जय महावीर’च्या घोषणा देत निघालेल्या भगवान महावीरांच्या प्रतिमेच्या मिरवणुकीने अवघे शिरूर शहरच महावीरमय झाले. फुलांनी सजविलेल्या रथावर भगवान महावीरांची प्रतिमा ठेवून काढलेल्या मिरवणुकीत जैन धर्माचे ध्वज नाचवीत पारंपारिक वेशातील असंख्य तरुणांसह अबालवृद्ध सहभागी झाले होते. मिरवणुकीवर ठिकठिकाणी फुलांच्या पाकळ्यांची बरसात केली, तर महावीरांच्या जीवनावर काही ठिकाणी देखावे सादर केले.
सकाळी गोडीजी पार्श्वनाथ जैन मंदिराजवळून या मिरवणुकीला सुरूवात झाली. अहिल्यानगर येथील स्वामी समर्थ बॅण्ड पथकाने, भक्तिगीते व भावगीतांच्या मधूर सुरावटीतून मिरवणुकीत रंगत भरली. या मिरवणुकीचे ठिकठिकाणी स्वागत झाले. तरूणांनी महावीरांच्या जयजयकाराने आसमंत दणाणून सोडला; तर महिला भगिनींनी महावीरांवरील गाणी गात उत्साह वाढविला. विविध संस्था व मंडळांनी यात्रेत सहभागी झालेल्यांना बिस्कीट पुडे, चॉकलेट, थंड पेय, कुल्फीचे वाटप केले. जैन स्थानकाजवळ महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष व माजी नगरसेवक विनोद भालेराव यांनी भाविकांना मिठाईचे वाटप केले.
जैन स्थानकाजवळ मिरवणुकीची सांगता झाली. यावेळी तपस्वी कंचनकंवरजी महाराज यांच्या मंगलपठणानंतर, जैन श्रावक संघाचे संघपती भरतकुमार चोरडिया, गोडीजी पार्श्वनाथ जैन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सतीश धाडिवाल, सचिव रमाकांत बोरा, माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत बोरा, गोरक्षण पांजरपोळचे माजी अध्यक्ष रमणलाल बोरा, जैन कॉन्फरन्सचे प्रांतीय अध्यक्ष सुनील बाफणा, रमेश कर्नावट, राजेंद्र कोठारी, विजय चोपडा, पंडित गांधी यांच्या हस्ते जैन स्थानकाच्या प्रांगणात धर्मध्वज फडकविण्यात आला.
प्रशांत गादिया यांनी धर्मगीताचे गायन केले. धरमचंद फुलफगर, अभय बरमेचा, प्रकाश कोठारी, सुरेश बोरा, प्रकाश बाफणा, राहुल बोथरा, रमणलाल भंडारी, आसराज मुथा, सूर्यकांत देसर्डा, शीतल दुगड, प्रीतेश कोठारी, विनय संघवी, सतीश संघवी, ललित नहार, रवींद्र कर्नावट, देवल शहा, कपिल बोरा, चंद्रकांत चोरडिया, प्रवीण मुथा, मयूर नहार, अमोल शहा, नितीन भंडारी, जयेश संघवी, लोकेश चोपडा, नीलेश भळगट, राजेश शिंगवी आदींनी संयोजन केले. महावीरांच्या जन्माचे स्वागत पेढे वाटून केले.
यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाह नाना पोटे, भाजप अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष विनोद भालेराव, लोकजागृतीचे संघटक रवींद्र धनक, शिवसेवा मंडळ ट्रस्टचे विश्वस्त श्रीनिवास परदेशी, भाजप अल्पसंख्याक आघाडीचे राजूभाई शेख, सकल मराठा समाज संघटनेचे अध्यक्ष प्रा. सतीश धुमाळ, युवा नेते अमोल चव्हाण, उद्योजक सागर नरवडे, प्रा. संपत लोखंडे, अशोक काळे, अविनाश जाधव आदी उपस्थित होते.
दरम्यान, जैन स्थानकात झालेल्या महावीर जयंती सोहळ्यात जैन पाठशाळेतील चिमुकल्यांनी महावीरांच्या जीवनावर नाटिका सादर केली. आरोही कटारिया, भाविक दरडा, विहा बोरा, नीरव दुगड, चेतन संघवी व देशना लुणावत यांनी महावीरांच्या गौरवपर गीते सादर केली. साध्वी देशनाजी महाराज महावीरांच्या जीवनकार्याचा आढाव घेणारे प्रवचन झाले.
संघपती भरतकुमार चोरडिया यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर, संघाचे सचिव वसंतलाल गादिया यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.