शिरूरमध्ये सेवाकार्यातून वाढदिवस साजरा

शिरूरमध्ये सेवाकार्यातून वाढदिवस साजरा

Published on

शिरूर, ता. १८ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस सेवाकार्याने साजरा करण्याच्या उपक्रमांतर्गत शिरूर शहर आणि परिसरात भाजपच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले. या उपक्रमांतर्गत शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असून, भाजीबाजार परिसरात साफसफाई करीत मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
भाजप पूर्व मंडल विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत पक्षाचे तालुकाध्यक्ष राहुल पाचर्णे, नगरसेवक संदीप गायकवाड, भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा रेश्मा शेख, शहर अध्यक्षा प्रिया बिरादार, तालुका संघटक अनघा पाठकजी, भाजप अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजू शेख, भाजयुमोचे शहर अध्यक्ष तुषार भदाणे पाटील, भाजपचे शहर उपाध्यक्ष नीलेश नवले, विजय नरके, हुसेन शहा, नवनाथ जाधव, ओंकार ससाणे, सचिन गरूडे आदींसह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते अभियानात सहभागी झाले होते. या अभियानांतर्गत तीन तास श्रमदान करून भाजीबाजार, अंडे बाजार, मटण मार्केट चा परिसर झाडून साफ केल्याची माहिती मोहिमेचे समन्वयक केशव लोखंडे यांनी दिली. आगामी १५ दिवस शहर आणि परिसरात विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती राहुल पाचर्णे यांनी दिली. नगरपरिषदेच्या सफाई कामगारांनीही या अभियानात सहभाग घेत कार्यकर्त्यांना साफसफाईच्या कामी मदत केली. स्वच्छता निरीक्षक डी. टी. बर्गे यांनी या अभियानात सहभागी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानले. तीन तास श्रमदानातून राबविलेल्या या स्वच्छता अभियानातून परिसराची साफसफाई झाली. एक ट्रॅक्टर ट्रॉली भरेल इतका कचरा गोळा झाला.
भाजपच्या बेटी बचाओ, बेटी पढाओ आघाडीच्या वतीने मुंबई बाजार परिसरातील अंगणवाड्यांमध्ये बालगोपाळांना, भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल पाचर्णे यांच्या हस्ते फळे आणि बिस्कीट पुड्यांचे वाटप करण्यात आले. अंगणवाडी सेविका अंबिका लोखंडे, उषा शिंदे, शुभांगी गायकवाड, कामिनी शेजवळ यांचा भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा रेश्मा शेख व तालुका संघटक अनघा पाठकजी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. `बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाच्या शहर अध्यक्षा कविता परदेशी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. भाजपचे शहर सरचिटणीस विजय नरके, रश्मी क्षीरसागर, वैशाली ठुबे, नयना परदेशी, वर्षा परदेशी, पूजा परदेशी, अरुणा परदेशी, शुभांगी कापसे, सारिका टाक, राहिल शेख आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com