शिरूरमधील रस्ते पावसामुळे जलमय

शिरूरमधील रस्ते पावसामुळे जलमय

Published on

शिरूर, ता. १ : शिरूर शहर व परिसरात शनिवारी (ता. १) सायंकाळी सुमारे दोन तासांहून अधिक वेळ ढगफूटीसदृष पाऊस झाला.यावेळी ३५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांसह बाजारपेठेतही त्रेधातिरपीट उडाली. पावसाच्या पाण्यामुळे रस्ते जलमय झाले होते. रस्त्यांवर पाणी आल्याने ठिकठिकाणी वाहतूक विस्कळित झाली.

शहर व परिसरावर दिवसभर गडद, काळ्याभोर ढगांचे धडकी भरविणारे सावट होते. त्यामुळे पाऊस कुठल्याही क्षणी कोसळेल असे चित्र होते. दुपारनंतर मात्र पावसाने हुलकावणी दिली असे वाटत असतानाच चारच्या सुमारास धुव्वाधार पावसाला सुरवात झाली. अचानक आणि मोठ्या स्वरूपात कोसळू लागलेल्या जलधारांनी सर्वत्र पाणीचपाणी झाले. शहरासह पुणे-नगर रस्त्यावरील पाषाणमळा, बोऱ्हाडे मळा, सरदवाडी, फलके मळा, कारेगाव, रांजणगाव गणपती या भागातही जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. अहिल्यानगर च्या बाजूने गव्हाणवाडी, वाडेगव्हाण, बेलवंडी रस्ता, देवदैठण परिसरातही धुव्वाधार पाऊस पडला. पावसाच्या रौद्ररूपामुळे वाहनचालकांना समोरचे काही दिसत नसल्याने अनेक वाहनचालकांनी वाहने रस्त्याकडेला थांबवून पाऊस उघडण्याची वाट पाहिली. पावसापासून वाचण्यासाठी रस्त्याकडेला झाडांखाली थांबलेल्या दुचाकीस्वारांनाही पावसाने झोडपून काढले. मुसळधार पावसाचा सलग दीड ते दोन तास आडवा - तिडवा मारा चालू होता.

. त्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक विस्कळित झाली. छोटे व्यावसायिक, रस्त्यावर पथारी मांडून व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांची आणि खरेदी, बाजारहाट करण्यासाठी घराबाहेर पडलेल्यांचीही या पावसाने त्रेधातिरपीट उडवली. गेले काही दिवस पावसाची संततधार चालू असल्याने शेतकरी वर्गाने खबरदारी घेतली होती. त्यामुळे शेतमालाच्या नुकसानीचे प्रकार ऐकिवात आले नाहीत. मात्र, सलग दोन तासांच्या संततधार व मुसळधार पावसाने शिरूर पंचक्रोशीसह परिसरातील शेतांत मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिले होते. त्यामुळे पिकांच्या नुकसानीची भीती व्यक्त केली जात आहे.

05806

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com