दिवे येथील लग्नसमारंभामधून साडेतीन लाखांचे दागिने लंपास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिवे येथील लग्नसमारंभामधून साडेतीन लाखांचे दागिने लंपास
दिवे येथील लग्नसमारंभामधून साडेतीन लाखांचे दागिने लंपास

दिवे येथील लग्नसमारंभामधून साडेतीन लाखांचे दागिने लंपास

sakal_logo
By

सासवड, ता. २७ : दिवे (ता.पुरंदर) येथील फोर्ट जाधवगड येथील हॉटेलमधील लग्न समारंभात चोरट्यांनी तब्बल ३,६०,०००  रुपयांचे दागिने व भेट वस्तूंवर हातसाफ केला. घटनेनंतर आठ दिवसानंतर सासवड पोलिसात संशयितांच्या विरोधात सासवड पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अलका सुरेश खाडे (वय ४५, रा. पिंपळे गुरव ) यांनी मंगळवारी (ता. २६) फिर्याद दिली आहे. यामध्ये त्यांनी विवाह समारंभात मेकअप करण्यासाठी आलेल्या तीन मुलींवर संशय व्यक्त केला आहे.
खाडे त्यांचे १,३५,००० रुपये किमतीची  तीन तोळे वजनाची सोन्याची मोहन माळ, ४०,००० रुपयांचे एक तोळा वजनाचे कानातील एक झुमके, ७५,००० रुपये  रोख रक्कम १,१०,००० रुपये किमतीचे  टायटन कंपनीचे कपंनीचे घड्याळ १०,००० किमतीचे एक घड्याळ,  डी.डब्लु.कंपनीचे २५,००० रुपयांचे एक घडयाळ, रॅडो कंपनीचे ७५,००० रुपये किमतीचे १ घड्याळ असा एकूण ३,६०,००० रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेला आहे. जाधवगड येथे हा विवाहसोहळा (ता.१७) पार झाला होता.

Web Title: Todays Latest District Marathi News Swd22b01760 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top