
विहीर पुनर्भरण व्यवस्थेसाठी सहभाग नोंदवा
सासवड, ता.९ : ''''जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार पाणी टंचाईच्या वेळी पिकांना संरक्षित पाणी उपलब्ध होण्याच्या उद्देशाने विहीर पुनर्भरण करून पाण्याची उपलब्धता वाढवावी, याबाबत शेतकऱ्यांनी विहीर पुनर्भरण व्यवस्था करण्यासाठी सहभाग नोंदवा'''', असे आवाहन तालुका कृषी अधिकारी पुरंदर सूरज जाधव यांनी केली.
खरीपपूर्व नियोजन गाव पातळीवरील ग्राम कृषी विकास समिती व शेतकरी यांच्यात चांबळी (ता.पुरंदर) येथे बैठक पार पडली. यावेळी त्यांनी खरीप हंगामाचे नियोजन गेल्या अनेक वर्षापासून आपण करतो. परंतु सदर नियोजन हे मुख्यत्वे जिल्हा व राज्यस्तरावरून केले जाते. याचा विचार करून कृषी आयुक्त व संचालक यांच्या सूचनेनुसार कृषी विभाग जास्तीत जास्त लोकाभिमुख कसा होईल, या अनुषंगाने खरीप नियोजन लोकाभिमुख होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.
या बैठकीमध्ये प्राधान्याने गतवर्षी खरीप हंगामात घेतलेल्या पिकाची उत्पादकता, चालू खरीप हंगामासाठी वाटाणा, बाजरी, गाजर, भुईमूग आदी पिकांची बियाणे उपलब्धता व त्यासाठी कृषी निविष्ठाची आवश्यकता, बियाणे उगवण क्षमता चाचणी तपासणी, हुमणी कीड नियंत्रण, पेरणी पूर्व केली जाणारी बीज प्रक्रिया, बीबीएफ यंत्राद्वारे पेरणी, पीक स्पर्धा, शेतीशाळा, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान प्रात्यक्षिक, फळबाग लागवड, फूल शेती, महाडीबीटी पोर्टल सर्व शेतकरी योजना आदी सर्व कृषी विषयक विषयांचे मार्गदर्शन करून खरीप हंगामाचे नियोजन केले.
दरम्यान, यंदाच्या खरीप हंगामात युरिया खताचा तुटवडा भासू नये म्हणून बफर स्टॉकच्या माध्यमातून युरिया खताचा पुरवठा वेळीच केला जाईल, असे जाधव यांनी
सांगितले. बैठकीस कृषी पर्यवेक्षक गणेश जगताप, ग्राम कृषी विकास समितीचे अध्यक्ष तथा सरपंच प्रतिभा कदम, उपसरपंच संजय कामठे, हनुमंत कामठे, पुरुष बचत गट प्रतिनिधी प्रशांत भालेराव, कृषी सहायक विजय जाधव, प्रगतिशील शेतकरी संतोष जाधव, शिवराम शेंडकर, ग्रामसेवक रमेश राऊत, मारुती कामठे तसेच शेतकरी उपस्थित होते.
-----------
02440
Web Title: Todays Latest District Marathi News Swd22b01768 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..