श्रीराम पवार, पाटणे, तरडे यांना आचार्य अत्रे पुरस्कार जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्रीराम पवार, पाटणे, तरडे यांना
आचार्य अत्रे पुरस्कार जाहीर
श्रीराम पवार, पाटणे, तरडे यांना आचार्य अत्रे पुरस्कार जाहीर

श्रीराम पवार, पाटणे, तरडे यांना आचार्य अत्रे पुरस्कार जाहीर

sakal_logo
By

सासवड, ता. २९ : आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान पुरंदर व महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सासवड यांच्या वतीने आचार्य अत्रे यांच्या स्मृतिदिनी १३ जून रोजी देण्यात येणारे साहित्य, पत्रकारिता व कलाकार पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार प्रसिद्ध लेखक प्राचार्य डॉ. यशवंत संभाजीराव पाटणे यांना तर आचार्य अत्रे पत्रकारिता पुरस्कार सकाळचे संपादक संचालक श्रीराम जयसिंगराव पवार यांना आणि कलाकार, दिग्दर्शक, चित्रपट निर्माते प्रवीण विठ्ठल तरडे यांना आचार्य अत्रे कलाकार पुरस्कार जाहीर झाला आहे.
प्रतिष्ठानच्या वतीने सन १९९१पासून हे पुरस्कार दिले जातात. पुरस्कारांमध्ये प्रत्येकी अकरा हजार रुपये रोख, मानपत्र, गौरवचिन्ह याचा समावेश आहे, अशी माहिती आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते, महाराष्ट्र साहित्य परिषद सासवड शाखेचे अध्यक्ष ॲड. प्रकाश खाडे यांनी दिली.
१३ जून रोजी दुपारी ४ वाजता सासवड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनात माजी आमदार उल्हास पवार यांचे हस्ते पुरस्कार वितरण कार्यक्रम होणार आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Swd22b01781 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top