दिवे येथे ३६ लाखांची वीज चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिवे येथे ३६ लाखांची वीज चोरी
दिवे येथे ३६ लाखांची वीज चोरी

दिवे येथे ३६ लाखांची वीज चोरी

sakal_logo
By

सासवड, ता. १५ : दिवे (ता. पुरंदर) येथील पवारवाडी भागातील साईनाथ आईस फॅक्टरीसाठी नारायण दगडू पवार (रा. पवारवाडी) याने मागील १२ महिन्यांत २ लाख ३४ हजार २४३ युनिटची वीजचोरी केली असून, महावितरण कंपनीचे ३५ लाख ८६ हजार ८३५ रुपयांचे आर्थिक नुकसान केले. त्यामुळे त्यांच्या विरुद्ध वीजचोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत महावितरण कंपनीचे अधिकारी व या प्रकरणातील फिर्यादी विक्रांत विलासराव सपाटे यांच्या तक्रारीनंतर सासवड पोलिस ठाण्यात वीज चोरीचा गुन्हा दाखल केला. पवारवाडी भागातील साईनाथ आईस फॅक्टरीसाठी आरोपी नारायण दगडू पवार यांनी २१ मार्च २०२१ ते २३ मार्च २०२२ दरम्यान चोरुन वीज वापरली. ही वीजचोरी २३ मार्च २०२२ रोजी पथकाने उघड केली. त्या दिवशी महावितरण कंपनीचे अधिकारी व या प्रकरणातील फिर्यादी विक्रांत विलासराव सपाटे व प्रज्ञा रोकडे (सहायक अभियंता), सागर जोडवे (सहायक अधिकारी), गणेश कराड (तंत्रज्ञ) यांच्यासमवेत वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार पथकाने फॅक्टरीला भेट दिली. त्यावेळी तपासणीत वीज वितरणचे अधिकृत कनेक्शन आढळले. परंतु, लगतच्या ट्रान्सफॉर्मरवर जार कोअरची अतिरिक्त वायर आढळून आली. सदरची वायर फॅक्टरीपर्यंत जमिनीत गाडून आणलेली आढळली. तसेच, अधिकृत कनेक्शन बंद करून ही चोरुन घेतलेली वीज जोडणीसाठीची बेकायदेशीर दुसरा स्वीच जोडल्याचेही दिसले. त्याचा पंचनामा करून व्हिडिओ क्लिप, छायाचित्रेही पथकाने काढली. नंतर मुद्देमाल जप्त करून सील केले. तसेच, नारायण दगडू पवार यांनी १२ महिन्यात २ लाख ३४ हजार २४३ युनिटची वीजचोरी केल्याचे महावितरण कंपनीचे ३५ लाख ८६ हजार ८३५ रुपयांचे आर्थिक नुकसान केल्याचे स्पष्ट झाले. त्यातून त्याची तडजोडीची रक्कम १९ लाख ६० हजार रुपये एवढी ठरवून भरण्याबाबत सांगितले. नंतर नोटीसही दिले. मात्र, अद्यापपर्यंत रक्कम न भरल्याने त्यांच्या विरुद्ध फिर्याद दाखल केली.

Web Title: Todays Latest District Marathi News Swd22b01803 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top