
सासवड येथे जगताप यांनी केली पाहणी
सासवड, ता. २३ : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा आषाढवारी पालखी सोहळा २४ आणि २५ जून रोजी त्यांचे धाकटे बंधू संत सोपानकाका महाराजांच्या सासवड नगरीत मुक्कामी आहे. २५ जून रोजी हा सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे. या काळात लाखो वारकरी सासवडमध्ये उपस्थित असतात. या पार्श्वभूमीवर पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी हवेली तालुक्यातील पालखी विसावा ठिकाणांपासून पुरंदर तालुक्यातील पालखी मुक्कामाची ठिकाणे आणि विसावा ठिकाणांची पाहणी करून तयारीचा आढावा घेतला.
या वेळी त्यांनी प्रशासनाला सूचना केल्या. दरम्यान, सासवड नगरपालिकेच्या सर्वच विभागांनी सोहळ्याच्या स्वागताची तयारी केली आहे. त्याची पाहणीही जगताप यांनी केली. त्यांनी झेंडेवाडी ते नीरा मार्गावरील सर्वच मुक्कामाची आणि विसावा ठिकाणांसंदर्भात तहसीलदार रूपाली सरनोबत, गटविकास अधिकारी अमर माने, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र पाटील, विद्युत विभागाचे अभियंता वनमोरे यांसह पालिका मुख्याधिकारी निखिल मोरे, आरोग्य विभाग प्रमुख मोहन चव्हाण आदींना सूचना केल्या. या वेळी माजी नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, मावळते नगरसेवक अजित जगताप, संजय ग. जगताप, सुहास लांडगे, मनोहर जगताप, विजय वढणे, अभियंता रामानंद कळसकर आदी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest District Marathi News Swd22b01809 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..