बचत गटाचे शेतकरी उत्पादक कंपनीत रूपांतर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बचत गटाचे शेतकरी उत्पादक कंपनीत रूपांतर
बचत गटाचे शेतकरी उत्पादक कंपनीत रूपांतर

बचत गटाचे शेतकरी उत्पादक कंपनीत रूपांतर

sakal_logo
By

श्रीकृष्ण नेवसे : सकाळ वृत्तसेवा
सासवड, ता.१७ : दिवेघाटावर झेंडेवाडी (ता. पुरंदर) येथील महिला शेतकऱ्यांनी एकत्र येऊन महिला बचत गट सुरू केला होता. आता या बचत गटाचे रूपांतर `पुरंदर लक्ष्मी शेतकरी उत्पादक कंपनी`त झाले आहे. अगोदरचा प्रक्रिया प्रकल्प सुरू असतानाच नव्या विस्तारित वाटाणा, सीताफळ व इतर शेतीमालावर प्रक्रिया करण्याची यंत्रणा घेणे, शीतकरण यंत्रणा, हार्डनर, ४० टन क्षमतेचे कोल्ड स्टोअरेज, शेड उभारणी आणि इतर यंत्रणांसाठी दोन कोटी खर्चाचा प्रकल्प आखला. त्यास कृषी यंत्रणेकडून स्मार्ट प्रकल्पातून ९७ लाखांचे कर्ज मंजूर झाले. महिलांचा स्वहिस्सा १४ लाख व बँकतर्फे ५२ लाखांचे पाठबळ मिळाले. त्यातून या महिला शेतकऱ्यांची कंपनी २० गुंठे क्षेत्रावर आकार घेत आहे.

खरे तर सन २०१४ मध्ये केवळ २० महिलांनी एकत्र येत अगोदर लक्ष्मी महिला शेतकरी बचत गट सुरू केला. लोणची, पापड, चटणी आदी तयार करून विक्रीपर्यंत मजल गेली होती. कृषी व नाबार्डकडून प्रशिक्षण घेतल्यावर कंपनी स्थापन्याचे बळ लॉकडउनमध्ये मिळाले. पुरंदर लक्ष्मी शेतकरी उत्पादक कंपनीच्या अध्यक्षा संगीता झेंडे, सचिव स्नेहल खटाटे, संचालिका मनीषा खटाटे, बायडा झेंडे, रूपाली खटाटे, जयश्री झेंडे, कविता झेंडे, शोभा झेंडे, आरती झेंडे, सारिका झेंडे आदींनी तांत्रिक कामासाठी समुहास सहाय होण्यासाठी विठ्ठल झेंडे यांना फ्रोझन शेतीमाल प्रक्रिया, शीतगृह व इतर तांत्रिक प्रशिक्षण घेण्याचे सुचविले.


कंपनीत सध्या ३५० भागधारक सभासद
कंपनीत सध्या ३५० भागधारक सभासद आहेत. कंपनीमार्फत परीसरातील विविध फळे, शेतीमालावर प्रक्रीया करून मूल्यवर्धन केले जाईल. शीतगृहात साठवणूक करत योग्य दर मिळताच विक्री उभारली जात आहे. कंपनीने तीन लाखांची फ्रोझन यंत्रणा व मोठा फ्रिज घेतलेलाच आहे. आता मागील महिन्यात भूमिपूजन होऊन शेतकरी उत्पादक कंपनीची उभारणी हाती घेतली. लवकरच कंपनीच्या प्रत्यक्ष शेतीमाल प्रक्रिया प्रकल्पात ५० महिला व वाहतूक, विक्री व्यवस्थेत १० पुरुषांना रोजगार उपलब्ध होईल.

पुढील वर्षी ५० लाखांचा व्यवसाय
कोरोनाचे संकट असतानाच सन २०२० मध्ये हीच संधी साधली व बचत गटाचे रूपांतर कंपनीत केले. अनेक निर्बंधांमुळे बाजारात मर्यादा असल्याने स्थानिक शेतकऱ्यांकडून कंपनीने सीताफळ, वाटाणा, टोमॅटो, कैरी खरेदी केली. कमाई वाढत असताना सन २०२०-२१ मध्ये ५.५ लाखांचा व्यवसाय केला. तर प्रक्रियेद्वारे सीताफळ पल्प (गर) पाच टन, फ्रोझन वाटाणा दोन टन, कैरी फोडी एक टन मालाची स्थानिक व नजिकच्या बाजारपेठेत विक्री केली. पल्प हैद्राबादच्या व्यापाऱ्यांना विकला. त्यातून १५ लाखांचा व्यवसाय सन २०२१ - २२ मध्ये झाला. पुढील वर्षभरात व्यवसाय ५० लाखांच्या पुढे जाईल, असे तांत्रिक सल्लागार विठ्ठल झेंडे म्हणाले.


कृषी संचालक (निविष्ठा - गुणनियंत्रण) दिलीप झेंडे, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) चे अधिकारी दशरथ तांभाळे, आमदार संजय जगताप, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे, तालुका कृषी अधिकारी सूरज जाधव, मंडळ अधिकारी शेखर कांबळे, नाबार्डचे सचिन कांबळे, रोहन मोरे, बँक महाराष्ट्राचे व्यवस्थापक विजय कांबळे, तांत्रिक सहायक विठ्ठल झेंडे आदींचे पाठबळ मिळाल्याने आम्हा महिलांच्या बचत गटाचे रूपांतर शेतकरी उत्पादक कंपनीत झाले. गटातर्फे पूर्वीपासूनच महिला सदस्यांना दुधाळ जनावरे खरेदीला, मुलांच्या शिक्षणाला रास्त व्याजदरात अर्थसाहाय्य दिले जाते. भविष्यात दूध डेअरी सुरू करण्याचे नियोजन आहे.`
- संगीता झेंडे, अध्यक्षा, पुरंदर लक्ष्मी शेतकरी उत्पादक कंपनी,
झेंडेवाडी
---------

02560, 02562

Web Title: Todays Latest District Marathi News Swd22b01829 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..