
पुरंदरमध्ये ६५ टक्के पेरण्या रखडल्या
सासवड, ता. २० : पुरंदर तालुक्यामधील पश्चिम भागात पावसाचा वेग कमी झाला असला तरी अधूनमधून पडणाऱ्या सरींमुळे सासवड व परिंचे कृषी मंडळांमध्ये वाफसा मिळण्यास वाव नसल्याने पेरण्या विलंबाच्याही खरीप पेरण्या रखडल्या आहेत. तालुक्यात एकूण अन्नधान्याचे खरिपातील क्षेत्र १९,२१९.३५ हेक्टर असून आतापर्यंत ३४.१९ टक्के क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. म्हणजेच ६५.८१ टक्के क्षेत्र पेरणीच्या प्रतीक्षेत आहे.
पिसर्वे व जेजुरी कृषी मंडळांमध्ये वाफसा निम्म्या क्षेत्रात मिळाल्याने हळू हळू पेरण्या पुढे जाऊ लागल्या आहेत. पुरंदर तालुका कृषी अधिकारी सूरज जाधव यांनी सासवड येथे नुकतीच तालुक्यातील सर्व कृषी मंडळ अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक आदी यंत्रणेची तातडीची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी ''सकाळ''शी संवाद साधला.
तालुक्यातील पीकनिहाय सरासरी क्षेत्र व प्रत्यक्ष पेरणी किंवा लागवड झालेले क्षेत्र टक्केवारीत पुढीलप्रमाणे : भात रोपवाटिका : सरासरी क्षेत्र १०२.०० हेक्टर - ११३.३३ टक्के पेरा, भात पीक : १२०८.१५ हेक्टर - ६.९६ टक्के लागण, धान्याची मका : ४६५.१६ हेक्टर - १३.९२ टक्के पेरा, बाजरी : १२,३२७.२० हेक्टर : ३६.७४ टक्के पेरा.
एकूण तृणधान्य : १४०००.५१ हेक्टर - ३३.४१ टक्के पेरा.
मूग : ३२७.०४, हेक्टर - ३३.१२ टक्के, तूर : २२२.१७ हेक्टर - २७.०५ टक्के पेरा, उडीद १६१.२९ हेक्टर - १६.१८ टक्के पेरा, इतर कडधान्य (वाटाणा - घेवडा) २१२१.८६ हेक्टर - ४०.४६ टक्के पेरा. एकूण कडधान्य २८३२.३६ हेक्टर - ३७.१७ टक्के पेरा.
भुईमूग २०४९.८० हेक्टर - ३२.३० टक्के पेरा, सूर्यफूल : १० हेक्टर - ० टक्के पेरा, सोयाबीन ३११.०२ हेक्टर - ५१.८९ टक्के पेरा, काराळे : १३.०६ हेक्टर - ९८.३९ टक्के पेरा, तीळ : २.६० हेक्टर - १९.२३ टक्के, इतर गळीत धान्य ० हेक्टर - ० टक्के पेरा. एकूण गळीत धान्य २३८६.४८ हेक्टर - ३५.२३ टक्के पेरा. एकूण अन्नधान्य - १९,२१९.३५ हेक्टर - ३४.१९ टक्के पेरा.
कांदा : ५२३.२० हेक्टर, टोमॅटो : ७००.२० हेक्टर, इतर फळभाज्या : २१०.४० हेक्टर, ओला हिरवा वाटाणा : १२४९.३० हेक्टर, पालेभाज्या : ५३५.६० हेक्टर * एकूण भाजीपाला : ३२१८.७० हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. यामध्येही ३५ ते ३८ टक्क्यांच्या दरम्यान पेरा किंवा लागणी आहेत.
खरीप चारा पिके एकूण सरासरी : ११२४.६० हेक्टर, मसाला पिके : ३६.०० हेक्टर, फुलशेती : ३२९.८० हेक्टर असून येथेही कमी - अधिक अशीच स्थिती आहे. दरम्यान लागणीच्या लहान पिकांना दीड आठवड्याच्या सततच्या पावसाने मार दिल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
तालुक्याच्या जवळपास ६० ते ६५ टक्के भागात वाफसा मिळेल तशा विलंबाने का होईना पेरण्या वाढतील. जूनमध्ये सरासरीच्या ६० व जुलैमध्ये सरासरीच्या ८० टक्के पाऊस झाला. खरीप पेरणीस विलंब झाल्याने मुग, उडीद याचे क्षेत्र कमी होण्याचे संकेत आहेत. तर सोयाबीन, कांदा, ऊस क्षेत्र यंदा वाढेल. असा आताच अंदाज आहे.
- सूरज जाधव, तालुका कृषी अधिकारी, पुरंदर.
-------
02573
Web Title: Todays Latest District Marathi News Swd22b01833 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..