आचार्य अत्रे व्यक्ती नाही तर संस्कृतीच होती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आचार्य अत्रे व्यक्ती नाही तर संस्कृतीच होती
आचार्य अत्रे व्यक्ती नाही तर संस्कृतीच होती

आचार्य अत्रे व्यक्ती नाही तर संस्कृतीच होती

sakal_logo
By

सासवड, ता. १३ ः समाजशिक्षण, प्रबोधनासाठी अष्टपैलू साहित्यिक आचार्य अत्रे यांनी लेखणी दुधारी करून वापरली. तसेच साहित्यातील अनेक प्रकारांत त्यांनी नवे पैलू शोधले. विनोद तर आजही अत्रेंचाच महाराष्ट्रात सर्वाधिक खपतो. माणूस वाचताना एकाच चेहऱ्यावर ते एका डोळ्यात हासू अन् दुसऱ्या डोळ्यात असू आणत असत. खरे तर आचार्य अत्रे ही एक व्यक्ती नाही, तर संस्कृतीच होती, असे प्रतिपादन २४ व्या आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व कोल्हापूरचे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी केले.
सासवड (ता. पुरंदर) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान, पुरंदर आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सासवड यांच्या संयुक्त विद्यमाने आचार्य अत्रे यांची १२४ वी जयंती आणि २४ वे अत्रे मराठी साहित्य संमेलन आज (ता. १३) सुरु झाले. यावेळी सायंकाळी साहित्यिक व श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून संमेलनाचे उद्‍घाटन झाले. यावेळी संमेलनाध्यक्ष म्हणून डॉ. लवटे बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर संयोजक व प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते, साहित्य परिषद शाखेचे अध्यक्ष अॅड. प्रकाश खाडे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रा. वसंत ताकवले, माजी आमदार अशोक टेकवडे, जिल्हा बँक अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, ज्येष्ठ कवी उद्धव कानडे, ख्वाजाभाई बागवान, अॅड. दिलीप निरगुडे, बंडुकाका जगताप, डॉ. राजेश दळवी, अॅड. कला फडतरे, शिवाजी घोगरे, शांताराम पोमण, श्रीहरी कोतवाल, रमेश कोतवाल, शशिकला कोलते, दशरथ यादव आदी उपस्थित होते.
यावेळी साहित्यिक व आमदार लहू कानडे म्हणाले, ‘‘अत्रे अष्टपैलू होते. त्यात पत्रकारिता व विनोद ही दोन त्यांची शिखरे व कळस होता. त्यांनी विनोदातून पण प्रबोधन केले. तर पत्रकारितेला लोकहिताची बाजू होती. या धामधुमीतही कवी मन अत्रेंनी जपले होते. एक माणुस काय काय करतो, चक्रावणारी गोष्टच जणू होती.’’
कार्यक्रमात प्रारंभी पाहुण्यांनी अत्रे प्रतिष्ठानच्या पुतळ्याचे पूजन केले. नंतर डॉ. आंबेडकर भवनात प्रत्यक्ष कार्यक्रमात प्रास्ताविक विजय कोलते यांनी केले. आढावा अॅड. प्रकाश खाडे यांनी सादर केला. स्वागत वसंत ताकवलेंनी केले. आभार शांताराम पोमण यांनी मानले. संमेलनानिमित्त उद्या (ता. १४) पुन्हा दिवसभर परिसंवाद, मुलाखत, बालआनंद मेळा, विनोदी कार्यक्रमांची रेलचेल आहे.
चारुशिला कांबळे यांच्या ‘रेकी एक महाशक्ती’ या पुस्तकाचे सुवर्णा चौधरी लिखित ‘आझादीचा सुवर्ण इतिहास स्त्री क्रांतीचा’ या पुस्तकांचे प्रकाशन झाले. तर स्वाती बंगाळे यांनी रेखाटलेल्या आचार्य अत्रेंच्या तैलचित्राचे अनावरण यावेळी साहित्य संमेलनात झाले.
2642

Web Title: Todays Latest District Marathi News Swd22b01862 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..