''पुरंदर नागरी''ची वार्षिक सभा खेळीमेळीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''पुरंदर नागरी''ची वार्षिक सभा खेळीमेळीत
''पुरंदर नागरी''ची वार्षिक सभा खेळीमेळीत

''पुरंदर नागरी''ची वार्षिक सभा खेळीमेळीत

sakal_logo
By

सासवड, ता.२२ : येथील (ता.पुरंदर) सहकारमहर्षी स्वर्गीय चंदुकाका जगताप यांनी स्थापन केलेल्या पुरंदर नागरी सहकारी पतसंस्थेची ३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा काल खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. शारदा लाॉन्सच्या सभागृहात संस्थेच्या अध्यक्षा आनंदीकाकी चंदुकाका जगताप यांच्या अध्यक्षतेखाली आणि पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप, सनदी अधिकारी राजेंद्र जगताप यांच्या उपस्थितीत सभा पार पडली झाली.

मार्च २०२१ अखेर सतत ऑडिट वर्ग `अ` असलेल्या या पतसंस्थेकडे २३७ कोटी ५३ लाख रुपयांच्या ठेवी, २५ कोटींचे भागभांडवल, १० कोटी १४ लाखांचा राखीव निधी, ४ कोटी ५२ लाखांची स्थावर मालमत्ता, ५१ कोटी ८७ लाखांची गुंतवणूक, १९३ कोटी ३७ लाख रुपयांचे कर्ज वाटप असून संस्थेला ७४ लाख ३७ हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. यंदाही संस्थेने सभासदांना ९ टक्के लाभांश देण्याचा निर्णय घेतला. संस्थेच्या १३ शाखा सुरू असून, ९ शाखा स्वतःच्या मालकीच्या इमारतीत आहेत. पतसंस्थेचे सहकारी बँकेप्रमाणे कामकाज चालू आहे. सभासदांनी संस्थेवर विश्वास ठेवून संस्थेच्या वाढीसाठी साथ द्यावी, असे आवाहन अध्यक्षा आनंदीकाकी जगताप यांच्या वतीने जगताप यांनी केले.

सभेच्या प्रारंभी स्व.चंदुकाका जगताप यांच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन झाले. संस्थेचे संचालक डॉ.विनायक खाडे यांनी प्रास्ताविक केले. संस्थेचे सरव्यवस्थापक अनिल उरवणे यांनी अहवालवाचन केले. काही सभासदांनी चर्चेत सहभाग घेतला. यावेळी भारती हॉस्पिटलच्या प्रमुख डॉ.अस्मिता जगताप, ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धिनी जगताप, मावळते नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, नंदकुमार जगताप, प्रा.डॉ. एम एस जाधव, संजय ग.जगताप, संपत जाधव, सुनीता कोलते आदींसह संस्था उपाध्यक्ष कृष्णा शेट्टी, संचालक अंकुश जगताप, कल्याण जेधे, नारायण कुंजीर, भारती देशमुख, युगंधरा कोंढरे, बाळासाहेब काळाणे, नंदकुमार निरगुडे, राजेश इंदलकर, माणिक चोरमले, सुनील खोपडे, अनंता तांबे, बाबा चौंडकर, दादासो सोनवणे, सुनील खोपडे, घनश्याम तांबे, सरव्यवस्थापक अनिल उरवणे, सतीश शिंदे आदींसह सल्लागार, शाखा प्रमुख, कर्मचारी, सभासद उपस्थित होते. प्राचार्य नंदकुमार सागर यांनी सूत्रसंचालन, तर संचालक आनंदराव घोरपडे यांनी आभार प्रदर्शन केले.
---------
02679

Web Title: Todays Latest District Marathi News Swd22b01876 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..