विसर्जन मिरवणुकीतील वादातून सासवडला तरुणावर वार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विसर्जन मिरवणुकीतील वादातून सासवडला तरुणावर वार
मिरवणुकीतील वादातून सासवडला तरुणावर वार

विसर्जन मिरवणुकीतील वादातून सासवडला तरुणावर वार

सासवड : सासवड (ता. पुरंदर) शहरात गणेशोत्सव मिरवणुकीत झालेल्या वादातून विक्रम ऊर्फ विकी विलास जगताप या तरुणावर धारदार शस्त्राने डोक्यावर वार झाले. याप्रकरणी ११ जणांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला.

याबाबत सासवडचे पोलिस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी माहिती दिली की, याप्रकरणी ऋशीकेश अर्जुन बांदल (वय ३२, रा. सासवड) यांनी फिर्याद दिली. यातील संशयित आरोपी कौशिक राजेंद्र जगताप, गौरव दिलीप जगताप, ओंकार ऊर्फ हॅंगर दयानंद फडतरे, सागर ऊर्फ गणेश ऊर्फ डेपो बाळासाहेब जगताप, पुष्कर ऊर्फ गोप्या सुनील जगताप, कुणाल ऊर्फ नन्या दशरथ जगताप व त्यांचे इतर ५ ते ६ सहकारी यांची नावे पोलिसांकडे नोंद झाली आहेत.
छत्रपती मंडळाच्या गणेश विसर्जनाची मिरवणुक शुक्रवारी रात्री नऊ वाजता हुंडेकरी चौकात आलेली असताना मंडळाचे अध्यक्ष मयूर जगताप हे कार्यकर्त्यांना मिरवणुक पुढे घेण्यासाठी पुढे चला, असे सांगत होते. त्यावेळी आरोपींनी त्यांना धक्काबुक्की केली. यावेळी मयूर यांचा भाऊ विक्रम हा आला व त्यानेही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर त्यांना एकाचा फोन आला की, भांडणे मिटवायची किंवा कसे, त्यावरुन कौशिक जगताप यांच्या नाईकवाडा येथील सिद्धेश्वर वखार समोरील ऑफिसवर मयूर, विक्रम हे चर्चेस रात्री दहा वाजता गेले. तिथे आरोपींनी त्यांना मारहाण करण्यास सुरवात केली. ओंकार फडतरे याने धारदार शस्त्राने विक्रम जगताप याचे डोक्यात वार केले. गौरव जगताप, कौशिक जगताप यांनी बॅटने, सागर जगताप, पुष्कर जगताप, कुणाल जगताप यांनी काठीने व इतरांनी लाथाबुक्यांनी मारहाण केली. आरडाओरडा झाल्यावर आजूबाजूचे लोक जमा झाले. ते पाहून ते सर्व तेथून दुचाकी व चारचाकी वाहनातून पळून गेले. विक्रम हा रक्तस्राव होऊन जखमी अवस्थेत पडला होता. रस्त्याने जाणाऱ्या वाहनाला थांबवून त्यास प्रथम सासवडला खासगी रुग्णालयात व नंतर पुण्याला रुग्णालयात हलविले.

Web Title: Todays Latest District Marathi News Swd22b01907 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..