
पुरंदरच्या गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ
सासवड, ता. २७ : पुरंदर तालुक्याचे भाग्यविधाते, शिक्षणमहर्षी चंदुकाका जगताप यांच्या नावाने ग्रामीण संस्थेच्या माध्यमातून ''चंदुकाका जगताप शैक्षणिक शिष्यवृत्ती'' या योजनेअंतर्गत पुरंदर हवेलीतील ५६ गावांतील १६३ गरजू विद्यार्थ्यांना १० लाख ५ हजार रुपयांच्या शिष्यवृत्ती वाटपाचा शुभारंभ ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धिनी जगताप यांच्या हस्ते पार पडला.
आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना सुरू झाली. सासवड नगरपरिषदेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनात पार पडलेल्या या कार्यक्रमात प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे धनादेश वाटप करण्यात आले.
यावेळी ग्रामीण संस्थेच्या भारती गायकवाड, मुन्ना शिंदे, प्राचार्य नंदकुमार सागर, प्राचार्य इस्माईल सय्यद, मुख्याध्यापक सुधाकर जगदाळे, उत्तम निगडे, शैलजा कोंडे, प्रल्हाद पवार, पांडुरंग पाटील, अनिल गद्रे, रेणुकासिंग मर्चंट, सरीता कपूर, एम. एस. जगताप आदी उपस्थित होते.
चंदुकाका जगताप यांना आर्थिक परिस्थितीअभावी शिक्षण घेता आले नाही. त्यामुळे आपल्याप्रमाणे समाजातील गरजू विद्यार्थ्यांवर ही वेळ येऊ नये म्हणून त्यांनी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या माध्यमातून पुरंदर - हवेलीसह परीसरातील तालुक्यातील दुर्गम डोंगरी भागातील मुलांमुलींपर्यंत शिक्षणाची गंगा पोहचवत मुलांना साक्षर आणि सक्षम केले, असे प्रा. डॉ. एम. एस. जाधव यांनी यावेळी नमूद केले.
ग्रामीण संस्थेचे संचालक डॉ. सुमीत काकडे, समन्वयक किशोरी पवार यांनी संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेतला.
रवींद्रपंत जगताप, अनिल उरवणे, अनिकेत भगत, विवेक जगताप, सूरज गदादे, हर्षदा पवार, दीपराज मेमाणे, आदित्य होले आदींनी या उपक्रमाचे संयोजन केले. महेश राऊत यांनी सूत्रसंचालन केले.
---------------------