आधुनिक शेतीशिवाय पर्याय नाही : बोरकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आधुनिक शेतीशिवाय पर्याय नाही : बोरकर
आधुनिक शेतीशिवाय पर्याय नाही : बोरकर

आधुनिक शेतीशिवाय पर्याय नाही : बोरकर

sakal_logo
By

सासवड, ता. २२ : पीक निवड, जमिनीचे आरोग्य, सिंचन व्यवस्था, निविष्ठा वापर, पीक काढणी पाश्चात्त्य तंत्र, मार्केटिंग, जोडव्यवसाय आदींचा अभ्यास शेतकऱ्यांचा हवा. अधिक उत्पादनासाठी आधुनिक शेतीशिवाय पर्याय नाही. यासाठी संशोधन व कृषी विस्तार प्रशिक्षणावर भर द्यायला हवा,'''' असे मत कृषी सहसंचालक (प्रशिक्षण-विस्तार) सुनील बोरकर यांनी येथे व्यक्त केले.

शासनाच्या पुणे विभागाचे कृषी यंत्रणेचे मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी बोरकर यांची पदोन्नती होऊन ते राज्याचे कृषी सहसंचालक (प्रशिक्षण-विस्तार) झाले. त्याबद्दल बोरकर यांचा विशेष सत्कार पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने माजी सनदी अधिकारी तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संभाजी झेंडे यांच्या हस्ते झाला.

यावेळी सासवड (ता.पुरंदर) येथील पांडुरंग भवनमध्ये झालेल्या कार्यक्रमास इस्कॉनचे सुंदरवर प्रभू, जैविक खत निर्माते डॉ. संतोष चव्हाण, तालुका कृषी अधिकारी सूरज जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य सुदाम इंगळे, निवृत्त कृषी अधिकारी सिद्दराम भुजबळ, दिलीप जाधव, अंजीर उत्पादक शेतकरी व संशोधन संघाचे उपाध्यक्ष रामचंद्र खेडेकर, प्रगतशील शेतकरी सुशीलकुमार जाधव, ज्ञानेश्वर फडतरे, विठ्ठल जगताप, आबा कोंढाळकर, बापू शेलार, दादा भोराडे, सुरेश टिळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोरकर म्हणाले, की पुरंदर तालुक्यात वाटाण्याचे (मटार) ग्रामोबिजोत्पादन कार्यक्रम राबवून कितीतरी गावांत मिळून सुमारे अडीच कोटी रुपयांचे प्रमाणित बियाणे उपलब्ध झाले होते. त्याच पध्दतीने तालुक्यात आयव्हीएफ (भ्रूण प्रत्यारोपण) तंत्रज्ञान वापरून गीर, सहिवाल अशा देशीचे गाईंचे गर्भ हस्तांतर (इब्रोय ट्रन्स्फर) यशस्वी केला आहे. सोळा गायींवर हा प्रयोग यशस्वी ठरून सुदृढ कालवडी जन्माला आल्याने नैसर्गिक शेती वा सेंद्रिय शेतीला देशी गायींमुळे बळ मिळावे हा उद्देश आहे.
सासवड इस्कॉन संचलित वसुंधराचे समन्वयक सागर भोंडे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
-------
02879