अतिवृष्टीचा अंजीर, सीताफळ बागांना फटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अतिवृष्टीचा अंजीर, सीताफळ बागांना फटका
अतिवृष्टीचा अंजीर, सीताफळ बागांना फटका

अतिवृष्टीचा अंजीर, सीताफळ बागांना फटका

sakal_logo
By

सासवड, ता. २२ : लागोपाठ आठवडाभर पडत असलेल्या पावसामुळे पुरंदर तालुक्यातील कित्येक अंजीर - सीताफळ बागांमध्ये वाफसाच येत नाही. उलट कित्येक बागांमध्ये आठवडाभर किंवा त्याहून अधिक दिवस पावसाचे पाणी साठून राहिले आहे. त्यामुळे मुळकुजीचे संकट घोंघावत आहे. तर फवारणी खर्च वाढूनही झाडे पिवळी पडण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यातून उत्पादनात घट व फळांची गुणवत्ता घसरण्याच्या शक्यतेने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

पुरंदर तालुक्यात विशेषतः डोंगरी भागालगत या बागा अधिक आहेत. त्यामुळे निचऱ्यासाठी एकाने पाणी काढून दिले, तरी दुसऱ्याच्या क्षेत्रात ते जाते. त्यात सतत पाऊस असल्याने पावसाचे पाणी मुरणे किंवा आटण्याचा विषय राहिला नाही.
राज्य अंजीर संघाचे उपाध्यक्ष तथा प्रगतशील फळ उत्पादक व व्यापारी रामचंद्र खेडेकर म्हणाले, की डोंगरी भागालगत असलेल्या अंजीर-सीताफळ बागांत सतत पावसाचा व बागेत पाणी साठून राहण्याचा प्रकार अधिक आहे. पाणी साठल्याने अन्नरस घेणाऱ्या मुळ्या कुजतात. सीताफळात शेंडे काळे पडतात. प्रसंगी करपा, तांबेरा वाढतो. काही वेळा झाडे वठतात. तर अंजिरात दोडीवर (लहान फळावर) काळे टिपके पडून फळही गळून पडते. फवारणी खर्च केला, तरी फळाची गुणवत्ता राहत नाही. खरे तर पाणी साठून राहिलेल्या किंवा वाफसा न

सततच्या पावसाने अंजीर असो सीताफळ असो मुळकुज होऊन झाडे वाळू शकतात. त्यामुळे पाणी काढून देणे वा निचरा करणे महत्त्वाचे आहे. पक्व फळे निचरा न झाल्यास तडकू शकतात. जोखीम कमी करण्यासाठी कॅलशियम नायट्रेट २ ते ५ ग्रॅम एक लिटर पाण्यातून फवारावे. सतत पाणी साठत असेल तर सच्छिद्र निचरा प्रणालीद्वारे हा प्रश्न कायमचा सुटू शकतो. हा प्रयोग जाधववाडी क्षेत्रावर केला आहे. तो पहावा.``
- डॉ. सुनील लोहाटे, फळ संशोधन विभाग, गणेशखिंड

अंजीर बागेत पाणी साचल्याने तांबेरा वाढतो. तांबेरा झालेली पाने काढून ती नष्ट करावीत. तो रोखण्यासाठी बावीस्टीन एक ग्रॅम, कवच दोन ग्रॅम व न्यूऑक्रॉन २.५ मिली लिटर
एक लिटर पाण्यातून फवारावे.
- दिलीप जाधव, निवृत्त कृषी अधिकारी व प्रयोगशील शेतकरी, काळेवाडी, ता. पुरंदर


खरिपाचे क्षेत्र : २१ हजार ५३२ हेक्टर
फटका बसलेले क्षेत्र : १० हजार ७६६ हेक्टर क्षेत्र
अंजीर क्षेत्र : १८०० एकर
सीताफळ क्षेत्र : ४५०० एकर
-------
02888