सासवडला ‘दिवाळी पहाट’ रंगली सुरेल संगीतात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सासवडला ‘दिवाळी पहाट’ रंगली सुरेल संगीतात
सासवडला ‘दिवाळी पहाट’ रंगली सुरेल संगीतात

सासवडला ‘दिवाळी पहाट’ रंगली सुरेल संगीतात

sakal_logo
By

सासवड, ता. २४ ः येथे ‘दिवाळी पहाट’निमित्त वैविध्यपूर्ण स्वरूपाच्या संगीतमय गीतांनी भल्या पहाटे रसिकांना सुरेल गीतांची मेजवानी मिळाली. सासवड शहर पत्रकार संघातर्फे दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात पुण्यातील संगीतकार राहुल घोरपडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘सूर हे तेजोमय’ ही सांगीतिक मैफील नव्याने नूतनीकरण करण्यात आलेल्या आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनात उत्तरोत्तर वाढवत नेली. खासदार सुप्रिया सुळे व आमदार संजय जगताप यांची उपस्थिती कार्यक्रमाचे आकर्षण ठरली.
भल्या पहाटे साडेपाच वाजता सुरु झालेली ही मैफील साडेतीन तासांहून अधिक काळ गीत, संगीत, विनोद, हशा, टाळ्यांसह रंगली. प्रारंभी भवनातील आचार्य अत्रे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. ख्वाजाभाई बागवान, कुंडलिक मेमाणे, नंदकुमार सागर आदींनी प्रारंभी नारळ फोडला. प्रभात समयी.. राहुल घोरपडे यांच्या या गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सुप्रसिध्द एकपात्री कलाकार दिलीप हल्याळ यांच्या विनोदी निवेदन शैलीने व प्रज्ञा देशपांडे, रमा काजरेकर आणि सुहास शामगावकर या गायक मंडळींनी या कार्यक्रमाची रंगत वाढवली. विजय उपाध्ये, सुनील जाधव, नीलेश श्रीखंडे, विलास क्षीरसागर, अथर्व क्षीरसागर या वाद्य वृंदांनी कार्यक्रमाला उत्तम संगीत साथ दिली. वेडात मराठे वीर दौडले सात या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
या प्रसंगी जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धीनी जगताप, पालिकेचे मुख्याधिकारी निखिल मोरे, आरोग्याधिकारी मोहन चव्हाण, माजी नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, संजय ग. जगताप, वामन जगताप, खाजाभाई बागवान, दीपक टकले, संतोष जगताप, अनिल जोशी, सुहास लांडगे, अजित जगताप, यशवंतकाका जगताप, अरुणआप्पा जगताप, नीता सुभागडे, अॅड. कला फडतरे, कुंडलिक मेमाणे, बाळासाहेब भिंताडे, सतीश उरसळ, सुधाकर जगदाळे, नंदकुमार सागर, स्वानंद लोमटे, माऊली गिरमे, मिलिंद जगताप यांसह सासवड परिसरातील अनेक संगीतप्रेमी मंडळी उपस्थित होती. पत्रकार संघाचे अध्यक्ष सुधीर गुरव, बाळासाहेब कुलकर्णी, जीवन कड, श्रीकृष्ण नेवसे, गणेश मुळीक, संभाजी महामुनी, मनोज मांढरे, जगदीश शिंदे, सुनील वढणे, राजेंद्र बर्गे, नितीन यादव, तानाजी सातव, संदीप जगताप आदींनी या उपक्रमाचे संयोजन केले. सूत्रसंचालन हेमंत ताकवले यांनी केले. तर आभार विजय कोलते यांनी मानले.