लोकशाहीसाठी ‘भारत जोडो’त सहभागी व्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोकशाहीसाठी ‘भारत जोडो’त सहभागी व्हा
लोकशाहीसाठी ‘भारत जोडो’त सहभागी व्हा

लोकशाहीसाठी ‘भारत जोडो’त सहभागी व्हा

sakal_logo
By

सासवड, ता. ३ : ‘‘आपल्या देशातील केंद्रातील हुकूमशाही पद्धतीचा कारभार, त्यातच वाढती बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार, केंद्रीय संस्थांचा गैरवापर आदी विरोधात जनजागृती करण्यासाठी आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी देशातील लोकशाही टिकवण्यासाठी ‘भारत जोडो’ यात्रेत नागरिकांनी सहभागी व्हावे,’’ असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार संजय जगताप यांनी सासवड येथे केले.
राहुल गांधी यांच्या ‘कन्याकुमारी ते काश्मीर’ या ‘भारत जोडो’ यात्रेचे ७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात आगमन होते आहे. या यात्रेच्या समर्थनार्थ आणि जिल्ह्यात जनजागृती करण्यासाठी व यात्रेत सहभाग वाढविण्याच्या आवाहनासाठी गुरुवारी (ता. ३) संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली सासवड ते लोणावळामार्गे देहूपर्यंत मोटरसायकल रॅलीचे आयोजन केले. या रॅलीचा प्रारंभ सासवड शहरात शिवतीर्थ चौकात झाला. सासवड येथील नगरपालिका चौकातील शिवतीर्थालगत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून या फेरी यात्रेचा प्रारंभ केला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे पुरंदर तालुकाध्यक्ष प्रदीप पोमण, प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव गणेश जगताप, तालुका महिलाध्यक्षा सुनीता कोलते, युवक अध्यक्ष माऊली यादव, दत्ता झुरंगे, बाळासाहेब पायगुडे, राजगौरी जगताप, मार्तंड भोंडे, यशवंत जगताप, विजय वढणे, संदीप जगताप, अजित जगताप, संजय ग. जगताप, मनोहर जगताप, रोहीत इनामके, नंदूकाका जगताप, राहुल गिरमे, मनीषा बडदे, स्वाती गिरमे, संदीप राऊत, सागर जगताप, नंदकुमार जगताप, अनिल उरवणे आदी उपस्थित होते.

देशात परिस्थिती बिकट आहे. देशातील वाढती बेरोजगारी, सतत वाढणारी महागाई, केंद्रातील हुकूमशाही, भोवतीचा भ्रष्टाचार, गैरप्रकार प्रचंड वाढत असताना केंद्र सरकार झोपेचे सोंग घेत आहे. जनतेची चिंता सोडून भलतीच विधाने करण्यात ही मंडळी गर्क आहेत.
- संजय जगताप, आमदार