संत सोपानकाका बँकेत विधी साक्षरता अभियान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संत सोपानकाका बँकेत विधी साक्षरता अभियान
संत सोपानकाका बँकेत विधी साक्षरता अभियान

संत सोपानकाका बँकेत विधी साक्षरता अभियान

sakal_logo
By

सासवड, ता. ६ : राष्ट्रीय विधी सेवा प्रतिष्ठान तसेच सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार सासवड येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय आणि सासवड बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सासवड (ता.पुरंदर) येथील संत सोपानकाका सहकारी बँकेत नुकतेच पॅन इंडिया कार्यक्रमांतर्गत विधी साक्षरता अभियान नुकतेच पार पडले.

सासवड न्यायालयाचे न्यायाधीश श्रीमती डी. एम. पाटील, न्यायाधीश एम. एस. भरड, सासवड बारचे अध्यक्ष ॲड. धनंजय भोईटे आदींनी या वेळी मार्गदर्शन केले. या विधी साक्षरता अभियानाच्या कार्यक्रमास ज्येष्ठ विधिज्ञ प्रकाश बोत्रे, अॅड. प्रसाद किकले, अॅड. नितीन जाधव, अॅड. सतीश राणे, बँकेचे व्यवस्थापक योगेश जगताप, राजेंद्र जाधव, संतोष गायकवाड यांसह ग्राहक व कर्मचारी, विविध बँक आणि पतसंस्थांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी सासवड न्यायालयाचे न्यायाधीश श्रीमती डी. एम. पाटील यांनी बँकिंग क्षेत्रातील विविध कायद्यांबाबत मार्गदर्शन केले.
अॅड. प्रसाद किकले यांनी १३८ एन.आय.अॅक्टबाबत माहिती देताना त्यातील नवीन दुरुस्त्या समजावून सांगितल्या. काही मान्यवर वकील मंडळींनीही बँकिंग क्षेत्रातील विविध कायद्याविषयी मनोगतात माहिती दिली. यावेळी बँकेचे व्यवस्थापक योगेश जगताप व सहकाऱ्यांनी प्रारंभी सर्वांचे स्वागत केले. तसेच पुरंदर-हवेलीचे आमदार व बँकेचे अध्यक्ष संजय जगताप यांच्या आर्थिक शिस्तीमुळे संत सोपानकाका बँक उत्तमपणे प्रगती करीत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. सासवड बारचे उपाध्यक्ष अॅड. रूपेश ताकवले यांनी सूत्रसंचालन केले.

02931