पुरंदरमध्ये २७ टक्केच तृणधान्य पेरण्या पुरंदरमध्ये अवघ्या २७ टक्के तृणधान्य पेरण्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुरंदरमध्ये २७ टक्केच तृणधान्य पेरण्या 
पुरंदरमध्ये अवघ्या २७ टक्के तृणधान्य पेरण्या
पुरंदरमध्ये २७ टक्केच तृणधान्य पेरण्या पुरंदरमध्ये अवघ्या २७ टक्के तृणधान्य पेरण्या

पुरंदरमध्ये २७ टक्केच तृणधान्य पेरण्या पुरंदरमध्ये अवघ्या २७ टक्के तृणधान्य पेरण्या

sakal_logo
By

सासवड, ता.१३ : परतीचा पाऊस अधिक काळ लांबल्याने व लवकर वाफसा न मिळाल्याने मोठ्या आशा असलेल्या रब्बी हंगामाच्या पेरणी- लागणी पुरंदर तालुक्यात लांबल्या आहेत. त्यातच ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात वाफसा मिळेल, तशा पेरण्यांना गती येत होती. मात्र नोव्हेंबरचा दुसरा आठवडा उजेडला तरी.. एकाच वेळी बहुतेक सारे रब्बीच्या तयारीला लागल्याने कुळव, पाभारी, ट्रॅक्टर, विविध यंत्रे, मजूर यांना मागणी वाढल्याने तालुक्यात सर्वाधिक क्षेत्र असलेल्या ज्वारीची २९.६३ टक्के पेरणी झाली, तर एकूण तृणधान्याची पेरणी अवघी २७.०७ टक्के झाली आहे.

आतापर्यंत पेरण्या या ७० ते ७५ टक्क्यांपर्यंत किंवा त्यापुढेही जायला हव्या होत्या. पण खरीप हंगाम सततच्या व अतिपावसाने अक्षरशः धुवून काढला. त्यातून खरीप हंगामाची अखेरच्या टप्प्यातील काढणी सुरू असताना मागील महिन्यातील अतिवृष्टीने खरीप काढणी लांबली. तर पाठोपाठ रब्बी हंगामाची पेरणी व लागवडही आपोआप चार आठवडे ते महिनाभर दूर गेली.

पुरंदर तालुक्यात प्रमुख पिकात जिरायती ज्वारी १९ हजार ४३४ हेक्टरवर असते. पैकी ५ हजार ७५७.८५ हेक्टरवर पेरणी आतापर्यंत झाली. तर बागायती ज्वारीत ४८.२१ टक्के पेरणी झाली. एकूण तृणधान्ये २७ हजार ७८३.३६ हेक्टवर क्षेत्रावर असते. त्याची पेरणी ७ हजार ५२१.७५ हेक्टरवर झाली.
पावसाचे दिवस वाढल्याने हंगाम तीन - चार आठवडे ते महिनाभरपर्यंत लांबतोय, असे शेतकरी उत्तम जगताप, शंकर झेंडे, संभाजी गरुड, राजेंद्र सोळकर, बाळासाहेब टिळेकर आदींनी सांगितले.


रब्बी हंगामातील प्रमुख पिकनिहाय पेरणी.....लागणी मुदत

जिरायती ज्वारी .....१० सप्टेंबर ते १० ऑक्टोबर
बागायती ज्वारी...१५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर
जिरायती गहू....१ नोव्हेंबर ते अखेर
बागायती गहू....१ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर
हरभरा....१ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर
कांदा रब्बी....नोव्हेंबर ते डिसेंबरअखेर
चारा पिके....१ नोव्हेंबर ते जानेवारीअखेर
पालेभाज्या...१५ सप्टेंबर ते जानेवारीअखेर (पाणी उपलब्धतेनुसार)
फळभाज्या...१५ सप्टेंबर ते जानेवारीअखेर (पाणी उपलब्धतेनुसार)


``पुरंदर तालुक्यात रब्बी कांदा २० टक्क्यांवर अडखळला आहे. मात्र टोमॅटो ७५.४४ टक्के, फळभाज्या ९८.६४ टक्के, पालेभाज्या १६९.०९ टक्के क्षेत्रावर लागणी होऊन या पिकांनी आघाडी घेतली आहे. तुलनेत एकूण तृणधान्याच्या पेरणीचा आलेख मात्र धिमा आहे. शेतकरी अवजारे, मजूर उपलब्धतेनुसार प्रयत्न करीतच आहेत.``
- सूरज जाधव, तालुका कृषी अधिकारी, पुरंदर.

मुळात पुरंदर तालुक्यात वाफसा अति व सततच्या पावसाने वेळेत झाला नाही. खरीप पीक काढणी लेट, मशागती लेट, मग आपोआप पेरणी लेटच झाली. आमच्या भागात तर आता कुठे आठ दिवसांपूर्वी ज्वारीची पेरणी सुरु झाली. गहू, हरभरा पिकाला तर अवकाशच आहे. त्यामुळे आपोआप रब्बी हंगामाची पीक काढणी सुद्धा लेट होऊन ज्यांच्याकडे पाणी कमी पडेल, त्यांचे उत्पादन नुकसान होईल. तरीही बहुतेक गावांत पाणी उपलब्धता चांगली आहे, त्यामुळे रब्बीवर भरवसा ठेवून आहोत.
- रामचंद्र खेडेकर, शेतकरी, गुरोळी, ता. पुरंदर.

02955