थापेवाडीत एकास दगडाने मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

थापेवाडीत एकास
दगडाने मारहाण
थापेवाडीत एकास दगडाने मारहाण

थापेवाडीत एकास दगडाने मारहाण

sakal_logo
By

सासवड, ता. २५ : थापेवाडी (ता. पुरंदर) येथे गावाच्या फाट्यावर मोहन नामदेव घारे (वय ४५, रा. गराडे, ता. पुरंदर) यांना व त्याच्या सहकाऱ्यास शिवीगाळ, दमदाटी करून दगडाने तोंडावर, नाकावर, पाठीवर मारहाण करण्यात आली. यातील संशयित आरोपी भानुदास किसन जगदाळे (रा. मठवाडी-गराडे) हा आहे.
थापेवाडी फाट्यावर बुधवारी (ता. २३) रात्री साडेआठ वाजता फिर्यादी मोहन घारे हे होते. त्यावेळी आरोपी भानुदास जगदाळे तिथे आले. त्याने काही एक कारण नसताना अगोदर शिवीगाळ करीत हाताने मारहाण केली. त्यानंतर दगडाने तोंडावर, नाकावर व पाठीवरसुद्धा मारले. तिथे जवळच उभे असलेले मोहन निवृत्ती जगदाळे हे भांडण सोडविण्यास गेले असता त्यांनाही त्याने हाताने मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केली.