Mon, Jan 30, 2023

सासवड येथे ४९ लाखांचा अपहार
सासवड येथे ४९ लाखांचा अपहार
Published on : 13 December 2022, 4:46 am
सासवड, ता. 13 : येथील ज्योतीचंद भाईचंद ज्वेलर्स शाखा क्रमांक २ येथे व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांसह संगनमताने सुमारे ९०५ ग्रॅम सोन्याची विक्री करून सुमारे ४९ लाख रुपये रक्कमेचा अपहार केला. याबाबत संबंधित ज्वेलर्सच्या मालकांनी सासवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
यातील संशयित आरोपींची नावे अशी पुढीलप्रमाणे- संदीप तानाजी बिचकुले (व्यवस्थापक, गंगानगर, हडपसर), निखिल पांडुरंग भापकर (कॅशिअर, सोमेश्वर, ता. बारामती), सागर बाबूराव हिरप (सेल्समन, सासवड, ता. पुरंदर). याबाबत स्वप्नील श्रेणिक शहा रा. मगरपट्टा सिटी, हडपसर, पुणे यांनी फिर्याद दिली आहे.
विशेष म्हणजे १७ आॅक्टोबर २०१८ पासून ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत हा गैरप्रकार केल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे.