दिव्यांगांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा ः जगताप

दिव्यांगांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा ः जगताप

सासवड, ता. ३ ः प्रत्येक दिव्यांग बांधव स्वावलंबी झाला पाहिजे. त्याने इतरांच्या मदतीवर अवलंबून न राहता स्वयंपूर्ण होण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील आहे. सामान्य व्यक्तींप्रमाणे त्याने उद्योग, व्यवसायात पदार्पण करून आपला आणि आपल्या कुटुंबांचा उदरनिर्वाह करावा. यासाठी सर्व प्रकारची मदत केली जाईल. आतापर्यंत संजय गांधी योजनेबरोबरच विविध योजनांच्या माध्यमातून दिव्यांगांना मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. यापुढील काळात जेजुरी एमआयडीसीमध्ये कंपनी स्थापन करण्यात येईल आणि या माध्यमातून उद्योग स्थापन करून जास्तीत जास्त दिव्यांगांना रोजगार निर्मितीसाठी प्रोत्साहित करण्यात येईल. कारण दिव्यांगांची सेवा हीचखरी ईश्वरसेवा असून त्यांचे आशीर्वाद खूप मोलाचे आहेत., असे प्रतिपादन आमदार संजय जगताप यांनी केले.
सासवड नगरपरिषदेच्या महात्मा फुले भाजी मंडई शॉपिंग सेंटरमधील दिव्यांग आरक्षण कोट्यातील दुकान वनपुरी येथील दिव्यांग म्हणून संभाजी महामुनी यांना ई - लिलाव पद्धतीने देण्यात आले असून त्याचे उद्‍घाटन आमदार संजय जगताप यांनी केले. यावेळी प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटना आणि पुरंदर दिव्यांग बहुद्देशीय औद्योगिक सहकारी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आमदार जगताप यांची नुकत्याच झालेल्या वाढदिवसानिमित्त पुस्तक तुला करण्यात आली. यावेळी प्रहारच्या राज्य महिलाध्यक्षा सुरेखा ढवळे, संजय गांधी योजना समितीचे सदस्य संभाजी महामुनी, प्रहारचे तालुकाध्यक्ष शिवाजी शिंदे, तालुका महिलाध्यक्षा रेखा धुमाळ, विजय तांबे, दत्तात्रेय जगताप, मनीषा गायकवाड, शंकर वांढेकर, गौरी धुमाळ, रूपाली साबळे, निजाम खान, सुनीता खोपडे, दैवशाला महामुनी, बायडाबाई झेंडे, नितीन झेंडे त्याच प्रमाणे भाजी मंडईमधील विक्रेते, व्यापारी, नागरिक उपस्थित होते.


तुलेतील सर्व पुस्तके शाळांना...
तालुक्यात दिव्यांग बांधवांच्या उन्नतीसाठी दिव्यांग औद्योगिक सहकारी संस्थेची स्थापना करण्यात आली असून जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी संस्थेचे शेअर्स घेऊन सभासद व्हावे असे आवाहन करतानाच तुला करण्यात आलेली पुस्तके शाळेमधील वाचनालयात देवून विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येतील., असे आमदार संजय जगताप व प्रहारच्या राज्य महिलाध्यक्षा सुरेखा ढवळे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com