
सासवड येथे ग्रो वेल स्कूलच्या वतीने मिरवणूक
सासवड, ता. २० ः ग्रो वेल स्कूलच्या सोनोरी रोड व सोपाननगर दोन्ही शाखांत शिवजयंतीनिमित्त मिरवणुकीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांनी एतिहासिक पोषाख परिधान करत सर्वांचे लक्ष वेधले. तसेच तलावरी, ढाल घेत मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला.भक्ती-शक्तीचा कार्यक्रम नागरीकांसाठी आकर्षणाचा विषय ठरला.
मिरवणुक पाहण्यासाठी पालखीतळ व सोनोरी रस्त्यावर नागरिकांनी गर्दी केली होती. अनेकांनी सजलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
दरम्यान, विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, विविध सरदार, मावळे, माता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, रामदास स्वामी, विविध पात्रे पोषाखातून सादर केली होती. मुख्याध्यापिका दिपाली गायकवाड, पर्यवेक्षिका विना बेदरकर, शिक्ष्िका सुलभा सावंत, वैशाली मोहिते, वर्षा होले, प्रियंका शिंदे, शारदा कुलकर्णी, सेजर्श्री जगताप, युती श्रीवास्तव, वृषाली जाधव, स्विटी निंबाळकर, अनुजा वरुसे आदींनी संयोजन केले होते. संस्था प्रमुख संदेश गायकवाड यांनी सहकार्य केले.