संत सोपानदेव मंदिरासाठी अधिकचा निधी द्या

संत सोपानदेव मंदिरासाठी अधिकचा निधी द्या

सासवड, ता. ५ : ''''महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. त्यांची शिकवण पुढच्या पिढीपर्यंत पोचवणे गरजेचे आहे. त्यामुळे संत सोपानदेव मंदिराच्या सुशोभीकरणासाठी सगळेच प्रयत्न करीत आहेत. आघाडी सरकारच्या काळात अजित पवार पालकमंत्री असताना या मंदिरासाठी अधिकचा निधी दिला होता. मात्र, आता याची कमतरता भासत आहे. शासनाने अधिकचा निधी विकासासाठी द्यावा,'''' अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.

सासवड (ता. पुरंदर) येथील संत सोपानदेव मंदिरामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुळे यांनी संत सोपानदेवांच्या समाधीची पूजन केले व दर्शन घेतले व देऊळवाड्याच्या जीर्णोद्धाराच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्या म्हणाल्या की, तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी पुढचा जीर्णोद्धार किंवा विकास टप्पा कसा गाठायचा आहे. यापुढे अजून इथे सुधारणा काय करता येईल, यासाठी मंदिराची भेट घेतली आहे.
यावेळी सुळे यांनी देऊळ परिसर व देऊळवाड्यात सुरू असलेल्या कामांची पाहणी करून माहिती घेतली. संत सोपानकाका मंदिराचे व देऊळवाडा अंतर्गत होत असलेल्या जीर्णोद्धाराची माहिती घेतली. मंदिराची प्राचीन माहिती व स्थापत्य कलेबाबत, मंदिरासमोरील नागेश्वर मंदिरातील आवाजाच्या वळणाची माहिती संत सोपानकाका देवस्थानचे प्रमुख अॅड. त्रिगुण गोसावी यांनी दिली. सुळे यांनीही खांबाला कान लावून आवाज येतोय का याची खात्री केली.

यावेळी मंदिर भेटीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे, कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे माजी अध्यक्ष विजय कोलते, अॅड. गोपाळ गोसावी, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पुष्कराज जाधव, सासवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब भिंताडे, अमोल कामथे, संतोष जगताप, गोविंद बोत्रे, अॅड. प्रकाश खाडे, बंडूकाका जगताप, अरुण अप्पा जगताप, अॅड. कला फडतरे, मनूतात्या जगताप, अतुल जगताप, महेश जगताप आदी उपस्थित होते.


03370

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com