पुरंदरमधील रस्त्यांसाठी ३१ कोटींच्या निधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुरंदरमधील रस्त्यांसाठी ३१ कोटींच्या निधी
पुरंदरमधील रस्त्यांसाठी ३१ कोटींच्या निधी

पुरंदरमधील रस्त्यांसाठी ३१ कोटींच्या निधी

sakal_logo
By

सासवड, ता. ११ : पुरंदर तालुक्यातील जिल्हा आणि राज्य मार्गांसाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याने प्रधानमंत्री ग्रामसडक योजना आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत ३१ कोटी ४० लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे, अशी माहिती आमदार संजय जगताप यांनी शुक्रवारी (ता.१०) दिली.

या रस्त्यांच्या कामामध्ये प्रकल्प जिल्हा मार्ग ४९ माहूर - तोंडल या पाच किलोमीटर अंतराच्या रस्त्यासाठी ३ कोटी ४१ लाख ५७ हजार रुपये, राज्यमार्ग ते जेऊर-पिसुर्टी - वाल्हा या साडेपाच किलोमीटर अंतराच्या रस्त्यासाठी पाच कोटी १२ लाख १९ हजार रुपये आणि प्रकल्प जिल्हा मार्ग ५० वाल्हा - मांडकी - वीर या रस्त्याच्या कामासाठी सहा कोटी ४८ लाख रुपये, राजुरी ते पोंढे या आठ किलोमीटर अंतराच्या प्रकल्प जिल्हा मार्गासाठी ७ कोटी रुपये, राज्यमार्ग १३१ पांगारे - हरगुडे - यादववाडी या ७ किलोमीटर अंतराच्या रस्त्यासाठी ४ कोटी ५४ लाख रुपये आणि पिसर्वे ते माळशिरस या साडेसहा किलोमीटर अंतराच्या प्रकल्प जिल्हा मार्गासाठी ४ कोटी ८४ लाख रुपयांच्या निधीला शासनाकडून मान्यता मिळाली आहे. येत्या काळात निधी मिळून कामाला सुरुवात होईल, असे आमदार जगताप यांनी सांगितले. दरम्यान, कामांस मान्यता दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे जगताप यांनी आभार मानले.
03395