सकारात्मक प्रक्रियेतूनच संवेदशीलतेची निर्मिती

सकारात्मक प्रक्रियेतूनच संवेदशीलतेची निर्मिती

सासवड, ता.२६ : ''''हाती घेतलेल्या व करीत असलेल्या कामातून काय मिळेल, मला माहीत नाही. पण पुढे त्याचा नक्कीच उपयोग होईल. कारण सकारात्मक काम करण्याच्या प्रक्रियेतूनच संवेदनशीलता निर्माण होते. कामातून मूल्य कळते. उत्तम निरीक्षण हेच उत्तम निर्णय घेण्यास भाग पाडते. तसेच त्रुटींकडेही लक्ष वेधते. त्यामुळे मनापासून सकारात्मकपणे कार्य करीत रहा,'''' असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठच्या व्यवस्थापन परिषद सदस्य रवींद्र शिंगणापूरकर यांनी केले.

नायगाव (ता.पुरंदर) येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सासवड (ता.पुरंदर) येथील वाघिरे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने २३ मार्च ते २९ मार्च या कालावधीत राष्ट्रीय सेवा योजना जिल्हास्तरीय विशेष शिबिर आयोजित केले आहे. या शिबिराचे उद्धाघाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य शिंगणापूरकर यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमास वाघीरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित शेळके, उपप्राचार्य डॉ. सुभाष वाव्हाळ, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.विशाल पावसे, प्रा. अनिल झोळ, नायगावचे सरपंच बाळासाहेब कड, हरिदास खेसे, राहुल कड, मंगेश चौंडकर, प्रा.शिवाजी भुजबळ, डॉ. बी. यु. माने, डॉ.विलास वाणी, डॉ.नानासाहेब पवार, डॉ. स्वप्नील जगताप, प्रा.तुषार घोरपडे, डॉ. ऋषिकेश कुंभार, प्रा. किरण गाढवे, समीर कुंभारकर, अंकुश धायगुडे, अप्पा खोमणे, गणेश खोडके, संतोष लोणकर, नवनाथ उरसळ, तसेच नायगावचे आजी - माजी पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

डॉ.विशाल पावसे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. समीर कुंभारकर यांनी सूत्रसंचालन तर आभार प्रा. किरण गाढवे यांनी मानले.


......

जिल्ह्यातील २०० स्वयंसेवक सहभागी
राष्ट्रीय सेवा योजना जिल्हास्तरीय विशेष शिबिरात पुणे जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांचे २०० स्वयंसेवक सहभागी आहेत. या शिबिरात वृक्षारोपण, ऊर्जा बचत जागृती, ग्रामस्वच्छता, आरोग्य जागृती, व्यसनमुक्ती, बालविवाह निर्बंध, व्यक्तिमत्त्व विकास, महिला सबलीकरण, प्रबोधनपर पथनाट्य, नव मतदार जागृती, ग्राम सर्वेक्षण, अवयवदान मोहीम, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच मान्यवर वक्त्यांच्या मार्गदर्शनाचे आयोजन केले आहे, असे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. विशाल पावसे यांनी सांगितले.

--------
03438

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com