सासवड येथे पाळणा गायन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सासवड येथे पाळणा गायन
सासवड येथे पाळणा गायन

सासवड येथे पाळणा गायन

sakal_logo
By

सासवड, ता. ६ : सासवड येथील दक्षिणमुखी मारुती मंदिरात चैत्र शुद्ध पौर्णिमेला (ता. ७) हनुमान जयंती सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. हनुमान प्रासादिक भजनी मंडळाचे भजन, जयश्री गिरमे, सुशीला चौखंडे, शैला शेवते या महिला भगिनींचे पाळणा गायन, घंटा व शंख निनादात महा आरती, सुंठवडा वाटप अशा स्वरूपात झालेल्या या जयंती सोहळ्यास सासवड मधील भाविकांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली.
   मंदिरातील हनुमान मूर्तीची फुले व द्राक्षांनी सजावट केली होती. पुजारी मोहन भैरवकर यांच्या पौरोहित्याखाली सर्व धार्मिक विधी व महापूजा करण्यात आली. बाजीराव जगताप (पाटील) यांना आरतीचा मान देण्यात आला. ॲड भगवान होले, महेश जगताप, राजेंद्र भैरवकर, विरेश दहीवले, राजू शिंदे, सुधाभाऊ गिरमे, पांडुरंग जगताप, विठ्ठल जगताप, संजय चव्हाण, मोहन चव्हाण, संजय काटकर, गिरी गोसावी महाराज आदींसह अनेक भाविक या वेळी उपस्थित होते. सूर्य उगवतीच्या वेळी
फुलांची उधळण करत बजरंग बली की जयच्या जय घोषात हा सोहळा पार पडला.