Wed, October 4, 2023

वाघिरे महाविद्यालयात रोजगार मेळाव्याचे आयोजन
वाघिरे महाविद्यालयात रोजगार मेळाव्याचे आयोजन
Published on : 28 April 2023, 12:03 pm
सासवड, ता. २८ : येथील वाघिरे महाविद्यालयात महाविद्यालय आणि मॅजिक बस इंडिया फाउंडेशन यांच्या वतीने भव्य रोजगार मेळावा बुधवारी (ता. ३) मे रोजी होणार आहे. या मेळाव्यामध्ये विविध क्षेत्रातील अनेक कंपन्या सहभागी होणार आहेत.
यामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना त्वरित नियुक्ती पत्रे दिली जाणार आहेत. त्यामुळे पुरंदर तालुक्यातील या सर्व शाखांमधील अंतिम वर्षात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. शिवाय २०१८-१९ वर्षापासून कला, वाणिज्य, विज्ञान उत्तीर्ण झालेले माजी विद्यार्थी सुद्धा या मेळाव्यात सहभागी होऊ शकतात. अशी माहिती प्लेसमेंट सेलचे समन्वयक प्रा. अजय गाढवे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांनी दिली.