घराजवळच मिळणार गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घराजवळच मिळणार गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा
घराजवळच मिळणार गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा

घराजवळच मिळणार गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा

sakal_logo
By

सासवड, ता.४ : शहरातील (ता. पुरंदर) साठेनगर, अशोकनगर, इंदिरानगर व इतर दुर्गम परिसराचा भाग आरोग्य सेवेपासून वंचित राहू नये, तसेच त्यांना घराजवळच गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी तसेच विविध रोगांचा प्रादुर्भावाचे निरीक्षण व नियंत्रणासाठी दुर्लक्षित समाजाचा आरोग्य निर्देशांक वाढविण्याकरिता `हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना` येथे सुरू केला आहे. सासवड नगरपालिकेच्याइमारतीमध्ये सोयीसुविधांसह शहरी आरोग्य वर्धिनी केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे

साठेनगर येथील दवाखान्याचा प्रारंभ आमदार संजय जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास सासवडचे उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार रूपाली सरनोबत, नगरपालिकेचे मुख्याधिकारी निखिल मोरे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय तिडके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विक्रम काळे, पालिकेचे आरोग्य विभाग प्रमुख मोहन चव्हाण, माजी नगरसेवक यशवंतकाका जगताप, विजय वढणे, मनोहर जगताप, अजित जगताप, प्रवीण भांडे, नंदकुमार जगताप, संतोष खोपडे, सागर जगताप, संतोष गिरमे, संभाजी जगताप, नगरपालिकेचे खातेप्रमुख संदेश मांगडे, रामानंद कळसकर, उत्तम सुतार, धोंडिराम भगनुरे आणि आरोग्य विभागातील कर्मचारी वर्ग, नागरिक उपस्थित होते.

दवाखान्यामध्ये दुपारी २ ते रात्री १० या वेळेमध्ये मोफत तपासणी व औषधोपचार, गर्भवती मातांची तपासणी, लसीकरण तसेच महिन्यातून निश्चित दिवशी नेत्र तपासणी, मानसिक आरोग्य समुपदेशन, विशेषज्ञ संदर्भ सेवा, बाह्य यंत्रणेव्दारे रक्त तपासणीची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. साळीआळी येथील दवाखानाही लवकरच सुरु होईल, असे मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी सांगितले. आरोग्य प्रमुख मोहन चव्हाण म्हणाले., या दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, बहुउद्देशीय कर्मचारी, अटेंडंट / गार्ड आणि सफाई कर्मचारी आदी मनुष्यबळही कायम उपलब्ध राहील.


दवाखानामध्ये मिळणाऱ्या आरोग्य सेवा
* बाह्यरुग्ण सेवा
* मोफत औषधोपचार
* मोफत तपासणी
* टेलीकन्सल्टेशन
* गर्भवती मातांची तपासणी
* लसीकरण
* महिन्यातून निश्चित दिवशी नेत्र तपासणी
* बाह्य यंत्रणेद्वारे रक्त तपासणी


03589