सासवड क्रेडिट सोसायटीच्या 
अध्यक्षपदी विकास राठोड

सासवड क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्षपदी विकास राठोड

सासवड, ता. २४ : सासवड (ता. पुरंदर) नगरपरिषदेच्या अंतर्गत सासवड नगरपरिषद कामगार क्रेडिट सहकारी सोसायटीची निवडणूक पार पडली. यामध्ये माजी अध्यक्ष मोहन चव्हाण व उपाध्यक्ष राजेंद्र निरगुडे यांनी राजीनामा दिल्यानंतर अध्यक्षपदी विकास राठोड व उपाध्यक्षपदी सुमीत साबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सासवड नगरपरिषद कामगार क्रेडिट सोसायटीच्या विशेष निवडणूक सभेच्या निवडणूक निर्णय अधिकारी एस. एन. देसाई होते. नूतन पदाधिकारी निवडीची माहिती देसाई यांनी दिली.
सासवड नगरपरिषद कामगार क्रेडिट सोसायटीच्या सचिव म्हणून सोपान जगताप हे या क्रेडिट सोसायटीचे काम पाहताहेत. तर संचालक मंडळामध्ये मोहन चव्हाण, काळूराम भोंडे, सविता जगताप, ज्ञानेश्वर जगताप, राजेंद्र टिळेकर, राजेंद्र बोरावके, राजेंद्र निरगुडे, धनराज जाधव, आशा रणपिसे, संगीता जाधव, प्रमोद भोंडे, राजेंद्र रणपिसे, तुकाराम जगताप आदींचा समावेश आहे.
या निवडीनंतर सासवड नगरपालिकेचे मुख्याधिकारी निखिल मोरे, सोसायटीचे मावळते अध्यक्ष मोहन चव्हाण, मावळते उपाध्यक्ष राजेंद्र निरगुडे यांनी नूतन अध्यक्ष राठोड व उपाध्यक्ष साबळे यांचे अभिनंदन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com