रेन वॉटर हार्वेस्टिंग, वृक्ष लागवड, जलसंधारणाचे कौतुक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेन वॉटर हार्वेस्टिंग, वृक्ष लागवड, जलसंधारणाचे कौतुक
रेन वॉटर हार्वेस्टिंग, वृक्ष लागवड, जलसंधारणाचे कौतुक

रेन वॉटर हार्वेस्टिंग, वृक्ष लागवड, जलसंधारणाचे कौतुक

sakal_logo
By

सासवड, ता.६ : सासवड (ता.पुरंदर) शहरातील लोकवस्त्यातील रेन वॉटर हार्वेस्टिंग, वृक्ष लागवड, संगोपन, भूजल वाढ, जलसंधारण, बंधाऱ्यांचे खोलीकरण आदी ठिकाणी अधिकाऱ्यांनी भेट दिली. जलशक्ती अभियानांतर्गत केंद्रीय संचालक पियुष सिंग, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि जिल्हा यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी यांनी नुकतीच भेट दिली. यावेळी कामांची पाहणी करून कामाचे कौतुक करून संबंधित अधिकाऱ्यांना काही उपयुक्त सूचनाही केल्या.

सासवड शहर असूनही येथे कऱ्हा नदी असल्याने आणि स्वच्छ सर्वेक्षण अभियानात हे शहर तीनवेळा देशात अव्वल ठरल्याने भेटीसाठी हे ठिकाण निवडले गेले. या भेटीत जलशक्ती अभियानाचे केंद्रीय संचालक तथा नोडल ऑफिसर पियुष सिंग यांच्यासह केंद्रीय अभियानाच्या तांत्रिक तज्ज्ञ श्रीमती अनू व्ही, जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्यासमवेत दौंड पुरंदरचे उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला, सासवड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे आदी टिमने ठिकठिकाणी संयुक्तरित्या पाहणी केली. या पाहणी रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पाची पाहणी केली. त्यासाठी सहारा सिल्वर हाउसिंग सोसायटीला भेट देण्यात आली. या सोसायटीचे अध्यक्ष नितीन घाडगे यांनी रेन हार्वेस्टिंगबाबत सविस्तर माहिती दिली. पाणी बोरवेलमध्ये सोडण्याआधी संचयातील पावसाचे पाणी फिल्टर केले जाते. या फिल्टरची स्वच्छता वर्षातून दोनदा केली जात असल्याबाबत सोसायटीचे अध्यक्ष घाडगे यांनी माहिती दिली. या प्रकारचे रेन वॉटर हार्वेस्टिंग केल्यापासून सोसायटीमध्ये उपलब्ध असलेल्या सर्व पाच पाचही बोरवेलला उन्हाळ्यात म्हणजे मे महिन्यात सुद्धा अखंडित पाणी सुरू आहे.

सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या टिमने वाघिरे कॉलेजला व प्रांगणात भेट देऊन येथे केलेल्या रेन वॉटर हार्वेस्टिंगची आणि वृक्षारोपण व संवर्धनाची पाहणी केली. कॉलेजचे प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांनी वृक्षारोपणाच्या प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती दिली. यामध्ये कॉलेज ग्राउंड परिसरात भारतीय प्रजातीचे सुमारे ३६७ वृक्ष लावण्यात आले आहेत. प्रत्येक वृक्षाची जोपासना करायची जबाबदारी एकेका विद्यार्थ्याला दिली आहे व त्या वृक्षाला त्या मुलाचे नाव दिले गेले आहे. अशाप्रकारे वैयक्तिक जबाबदारी असल्याने वृक्षाचे संवर्धन योग्य प्रकारे केले जात आहे., असे डॉ.. शेळके यांनी अधिक माहितीत सांगितले. तसेच लगतच्या ठिकाणी सुद्धा संस्थेच्या साबळे फार्मसी कॉलेजच्या छतावरचे पाणी गोळा करून गाळण यंत्रणेद्वारे बोरवेलमध्ये पुनःभरण पद्धतीने सोडले आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंगचे पाणी बोरवेलमध्ये सोडल्याने वर्षभर बोरवेलच्या पाण्याचा अखंडित पाणीपुरवठा सुरू आहे., असे प्राचार्या डॉ. राजश्री चव्हाण यांच्या वतीने सांगण्यात आले.
कऱ्हा नदीवरील जलयुक्त शिवार अभियानातून झालेल्या कंबळेश्वरजवळील ७५ लाख खर्चाच्या सिमेंट बंधाऱ्याला भेट दिली. तिथे लगत असलेल्या शेतशिवारात किती विहीरींना व शेतजमिनीला सिंचनासाठी फायदा होतो, याची माहिती सिंग, देशमुख आदींनी शेतकऱ्यांकडून व नगरपरीषद यंत्रणेकडून घेतली.

केंद्रीय व जिल्हा यंत्रणा टिमने सिद्धेश्वर बंधाऱ्याचा लोकसहभागातून व नगरपरीषदेच्या पुढाकारातून गाळ काढण्याच्या कामाची पाहणी केली, अशी माहिती मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी सर्व टिमला दिली. विनामूल्य गाळ काढून धरणाची साठवण क्षमता वाढवण्याच्या उद्देश आहे. धरणाची साठवण क्षमता वाढल्यास पुढील उन्हाळ्यात परिसरातील नागरिकांना निश्चितच फायदा होईल, असे पाणी पुरवठा अभियंता रामानंद कळसकर म्हणाले.
----------

03663