सासवड येथे पर्यावरण रक्षणाची शपथ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सासवड येथे पर्यावरण रक्षणाची शपथ
सासवड येथे पर्यावरण रक्षणाची शपथ

सासवड येथे पर्यावरण रक्षणाची शपथ

sakal_logo
By

सासवड, ता. ६ : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पुरंदर तालुका तहसीलदार कार्यालयाजवळ आणि सासवड शहरात कमळेश्र्वर दशक्रिया घाटावर वडाच्या रोपांची लागवड करण्यात आली. यावेळी उपस्थित अधिकारी, महिला, नगरपालिका कर्मचारी महिला, नागरिक आदींनी पर्यावरण रक्षण करण्याची शपथ घेतली.

सासवड नगरपालिका आणि एकनाथकाका जगताप प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन केले होते. वटपौर्णिमा सणाचे महत्त्व लक्षात घेऊन महिलांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले होते. ''प्लॅस्टिकच्या प्रदूषणाला जोरदार तडाखा देवून त्याचा पराभव करा'' हे आजच्या पर्यावरण दिनाचे घोषवाक्य अधोरेखित करत शहरातील बहुतांशजणांनी सहभाग नोंदविला. यावेळी नूतन भोंगळे, सोनाली शिवरकर, अभिलाषा भोंगळे (सासवड), तेजस्विनी ताम्हाणे (वाळूंज), पार्वती साळुंखे, सत्यभामा मुरकुटे (रा. नावळी) यांच्यासह सासवड नगरपालिकेच्या वसुली अधिकारी रंजना दुर्गाडे, लेखा विभागाच्या अस्मा शेख, अमृता रणपिसे, सविता जगताप, श्रावणी गाढवे, नीलिषा रासकर, प्राजक्ता राजगुरू आदी नगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी महिलांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला. दरम्यान, तेजस्विनी ताम्हाणे या भगिनीचा आज वाढदिवस असल्याने तिचा नगर पालिकेच्या वतीने गौरव करण्यात आला.

प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष जगताप, सदस्य ऋषिकेश मुरकुटे, नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी मोहन चव्हाण, अभियंता विशाल पाटील, राम कारंडे, सेवा निवृत्त बँक अधिकारी हेमंत ताकवले, संजय (मंत्री) जगताप, दादा सोनवणे, अमित बहिरट या मंडळींनी याप्रसंगी हजेरी लावली.

03670