सासवडमध्ये कंत्राटदाराला
काम रोखण्यासाठी मारहाण ​

सासवडमध्ये कंत्राटदाराला काम रोखण्यासाठी मारहाण ​

Published on

सासवड, ता. १ : सासवड (ता. पुरंदर) येथील खंडोबानगर झोपडपट्टी परिसरात कॉंक्रीटीकरणाचे काम सुरु असताना, ‘येथे काम करू नका’ असे म्हणून सरकारी कंत्राटदाराला मारहाण केल्याची घटना शुक्रवारी (ता. ३१) सायंकाळी घडली. या घटनेत कंत्राटदार जखमी झाला असून, सासवड पोलिस ठाण्यात अनिल प्रमोद सोळंकी आणि रोशन प्रकाश वाघमारे या दोन आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत कंत्राटदार तेजराज जालिंदर काकडे (रा. केशवनगर, सासवड) यांनी सासवड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार ते २७ ऑक्टोबरपासून खंडोबानगर झोपडपट्टी येथे अंतर्गत बोळींच्या कॉंक्रीटीकरणाचे काम करत होते. ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी दुर्गादेवी मंदिराशेजारील बोळीत काम चालू असताना अनिल प्रमोद सोळंकी नावाचा मुलगा तिथे आला. त्याने काकडे यांना, ‘येथून हला, येथे काम करू नका,’ असे म्हणून दमदाटी व शिवीगाळ केली. यानंतर झालेल्या झटापटीत अनिल सोळंकी याने त्यांना हडको- खंडोबानगर रस्त्यावर आणले. तिथे बाचाबाची सुरू असताना अनिल सोळंकी याने दगड उचलून काकडे यांच्या डाव्या हातावर मारला. ​त्याचवेळी रोशन प्रकाश वाघमारे हा सोळंकी याचा जोडीदार तेथे आला. त्याने शिवीगाळ करत तिथे पडलेला लाकडी रंदा उचलून काकडे यांच्या उजव्या कानाच्या वर डोक्यात मारला. त्यामुळे काकडे यांच्या डोक्यातून रक्तस्राव सुरु झाला आणि ते खाली पडले. त्यांच्यावर सासवड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या झटापटीत काकडे यांच्या हातातील घड्याळदेखील गहाळ झाले आहे. आरोपींनी काकडे यांच्या सहकाऱ्यालाही शिवीगाळ व दमदाटी केली. याबाबत पोलिस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com