
तळेगावात आजपासून हनुमान देवाचा उत्सव
तळेगाव ढमढेरे, ता. ५ : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे श्री हनुमान (मारुती) देवाचा उत्सव शुक्रवार (ता. ६) व शनिवार (ता. ७) या दोन दिवशी साजरा होणार आहे. उत्सवाचे हे ९१ वे वर्ष आहे, अशी माहिती श्री हनुमान उत्सव मंडळाचे अध्यक्ष अरविंददादा ढमढेरे यांनी दिली.
उत्सवानिमित्त शुक्रवारी सकाळी श्री हनुमान देवाची महापूजा व अभिषेक होणार आहे. तसेच, सकाळी श्री हनुमान देवाचा वाजत गाजत हरिनामाच्या गजरात छबीना निघणार आहे. दुपारी अडीच वाजता कलगीवाले शाहीर नवनाथ काळे आणि तुरेवाले शाहीर रामदास गुंड यांचा कलगीतुरा हा मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित केला आहे. तसेच, रात्री विठाबाई नारायणगावकर यांचा लोकनाट्य तमाशा होणार आहे. तसेच, शनिवारी दुपारी तीन वाजता कुस्त्यांचा जंगी आखाडा आयोजित केला आहे. रात्री दहा वाजता प्रकाश अहिरेकरसह नीलेशकुमार अहिरेकर यांचा लोकनाट्य तमाशा आहे.
Web Title: Todays Latest District Marathi News Tgd22b01556 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..