कासारीत आंतरपिके ठरतायेत वरदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कासारीत आंतरपिके ठरतायेत वरदान
कासारीत आंतरपिके ठरतायेत वरदान

कासारीत आंतरपिके ठरतायेत वरदान

sakal_logo
By

तळेगाव ढमढेरे, ता. १२ : कासारी (ता. शिरूर ) येथील अनेक शेतकऱ्यांनी कमीत कमी शेती क्षेत्रात विविध आंतरपिके घेऊन शेती व्यवसायाकडे विशेष लक्ष दिले आहे. येथील बहुतांश शेतकऱ्यांना आंतरपीक हे वरदान ठरले आहे. येथील हनुमंत भुजबळ, रामभाऊ भुजबळ व तबन भुजबळ या तीन भावांनी आई- वडिलांच्या प्रेरणेने आपल्या अल्प शेती क्षेत्रात विविध आंतरपिके घेतली आहेत.
हनुमंत भुजबळ यांनी आपल्या कुटुंबाच्या मदतीने आंतरपिकातून भरारी घेतली आहे. कासारीतील बहुतांश शेतकरी चासकमानच्या पाण्यावर अवलंबून आहेत. भुजबळ यांनी सीताफळाच्या बागेमध्ये उन्हाळी भुईमूग व मुगाचे आंतरपीक घेतले आहे. त्यांच्या शेतात सीताफळ तसेच संत्री, मोसंबी, आंबा, नारळ, पेरू, चिकू, लिंबू, शेवगा आदी फळझाडे आहेत. या आंतरपिकांच्या माध्यमातून उत्पन्नातून समाधानकारक उत्पन्न मिळत आहे.
दरम्यान, काढणीच्यावेळी शेतमजुरांची कमतरता भासते त्यामुळे अनेकवेळा घरातील सदस्यांना आंतरपिकाची काढणी करावी लागते.

सेंद्रिय शेतीकडेही कल
हनुमंत भुजबळ फळझाडांना ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देण्यास प्राधान्य देतात. वेळच्यावेळी रोग नियंत्रणासाठी माफक फवारणी केली जाते. तसेच भुजबळ यांचा सेंद्रिय शेतीकडेही कल वाढला आहे. शेतातच पाण्याची विहीर असून शेजारी ५० हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधली आहे. कमी पाण्यात व कमी कालावधीत आंतरपिके घेतली असून उत्पन्नही बऱ्यापैकी मिळते.


बाजारभाव चांगला मिळाला तर शेती चांगली परवडते. कोरोनाच्या काळात शेतीत चांगले उत्पन्न निघाले परंतु लॉकडाउनमुळे बाजारभाव कमी मिळाला त्यामुळे आर्थिक नुकसान सोसावे लागले. सध्या शेतात घेतलेल्या आंतरपिकांचे चांगले उत्पन्न निघेल.
- हनुमंत भुजबळ, शेतकरी

63666

Web Title: Todays Latest District Marathi News Tgd22b01558 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top