हर्षदाच्या आई-वडिलांचा सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हर्षदाच्या आई-वडिलांचा सन्मान
हर्षदाच्या आई-वडिलांचा सन्मान

हर्षदाच्या आई-वडिलांचा सन्मान

sakal_logo
By

तळेगाव ढमढेरे, ता.९ : निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील विद्या विकास मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांनी वडगाव मावळ येथील वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक मिळवलेली जगतज्जेती हर्षदा शरद गरुड हिच्या आई-वडिलांचा नुकताच सत्कार केला.
सुवर्णपदक मिळाल्यानंतर हर्षदा वडगाव मावळ येथे येईल असे सर्वांनाच वाटले होते. ती ग्रीस येथून आली असून पतियाळा येथे पुढील प्रशिक्षण घेत असून तिला गावी येण्यासाठी आणखी बरेच दिवस लागणार आहेत. त्यामुळे निमगाव म्हाळुंगी येथील शिक्षकांनी हर्षदाच्या आई-वडिलांचा घरी जाऊन गौरव केला.
उर्मिला मांढरे (आत्या) व प्रा. संजीव मांढरे (मामा) यांची हर्षदा ही भाची असून आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग खेळात सुवर्णपदक मिळविल्याचा आनंद तिचे आई-वडील, सर्व नातेवाईक व ग्रामस्थांना झाला आहे, असे हर्षदाचे वडील शरद गरुड यांनी यावेळी सांगितले.
हर्षदा सध्या तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयात प्रथम वर्ष कला शाखेत शिकत आहे. हर्षदाचे वडील नगरपंचायत वडगाव मावळ येथे लिपिक या पदावर सेवेत आहेत.
यावेळी हर्षदाचे मामा प्रा. संजीव मांढरे, प्रा. नागनाथ शिंगाडे, प्रा संजय देशमुख, महेश शेलार, रमेश जाधव, डॉ. किशोर सातकर व प्रा. राजेंद्र गायकवाड आदी शिक्षकांनी सत्कार केला.

03220

Web Title: Todays Latest District Marathi News Tgd22b01562 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top