लांडेवस्तीत विद्यार्थी, शिक्षकांना ''नासा''चे बोर्डिंग पास उपलब्ध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लांडेवस्तीत विद्यार्थी, शिक्षकांना ''नासा''चे बोर्डिंग पास उपलब्ध
लांडेवस्तीत विद्यार्थी, शिक्षकांना ''नासा''चे बोर्डिंग पास उपलब्ध

लांडेवस्तीत विद्यार्थी, शिक्षकांना ''नासा''चे बोर्डिंग पास उपलब्ध

sakal_logo
By

तळेगाव ढमढेरे, ता.९ : येथील (ता.शिरूर) लांडेवस्तीवरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील २७ विद्यार्थी व शिक्षकांची नावे NASA (नासा) द्वारे चंद्रमोहिमेवर जाणाऱ्या यानातून चिपमधून चंद्रावर जाणार आहेत. त्याचे बोर्डिंग पास नासाद्वारे उपलब्ध झाले आहेत. त्याचे वाटप नुकतेच करण्यात आले.

नावीन्यपूर्ण उपक्रमाद्वारे चंद्र मोहिमेवर जाणारी महाराष्ट्रातून पुणे जिल्हा परिषदेची लांडे वस्तीवरील शाळा पहिली ठरली आहे, अशी माहिती मुख्याध्यापक रेश्मा शेख यांनी दिली.
बोर्डिंग पासचे वाटप बाळासाहेब लांडे, दशरथ आढाव, मोहन भुजबळ, अमोल लांडे, सुभाष लांडे, उमेश आढाव यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका रेश्मा शेख, सहशिक्षिका विजया लोंढे, अंगणवाडी सेविका सरस्वती सिनलकर, मदतनीस शोभा सिनलकर, शीतल भुजबळ, सारिका भुजबळ, सुषमा धायरकर, कल्पना गायकवाड, स्वाती लांडे, स्वाती भुजबळ, सारिका लांडे, सुनीता लांडे उपस्थित होते.
उपक्रमाचे कौतुक प्राथमिक शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड, गटशिक्षणाधिकारी अनिल बाबर, विस्तार अधिकारी वंदना शिंदे, केंद्र प्रमुख श्रीहरी पावसे यांनी शाळेचे कौतुक केले आहे.

03227

Web Title: Todays Latest District Marathi News Tgd22b01565 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top